चंद्रपूर - भारतीय जनता पार्टी प्रणित चंद्रपूर शहर महानगरपालिकाच्या माध्यमातून शहरात तथा नगीनबाग प्रभागात अनेक विकास कामे सुरू आहेत या विकासाच्या मालिकेतून नगीनबाग प्रभागात नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे भाजप प्रणित चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या माध्यमातून नगीना प्रभागात विकासाकरिता मोठ्या प्रमाणात विशेष निधीची उपलब्धता झाली आहे , चंद्रपूर शहराच्या विकास कामात प्रथम प्राधान्याने करण्याचे मानस आम्ही ठरवलेले आहेत शहरातील लोकांनी जो विश्वास, प्रेम,सहकार्य, ,आशिर्वाद दिला आहे त्याला कधीच विसरू शकणार नाही आणि दिलेला शब्द पूर्ण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे असे मत माजी मंत्री व लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात विविध विकासकामाचे सत्र शहरात व नगीनबाग प्रभागातील समस्या मार्गी लावण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न आहे नगीनबाग प्रभागात हे विकास कामाचे केंद्र बिंदू ठरणार व प्रभागातील जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करत चंद्रपूर शहर व नगीना प्रभागातील विकास कामाची मालिका अव्याहत सुरू ठेवणार हा माझा संकल्प राहणार असे राहुल पावडे उपमहापौर असे भूमिपूजन स्थळी प्रभागातील नागरिकांना संबोधित करत होते नगीना प्रभाग क्रमांक 9 मध्ये श्री गावंडे ते श्री रायपुरे श्री भगत ते थमके तथा श्री वैरागडे यांच्या घराजवळ सिमेंट कॉंक्रीट रस्ता भूमिपूजन याच्या सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला मनपाचे नगरसेवक प्रशांत उर्फ बंटी चौधरी सविता ताई कांबळे नगरसेविका वंदनाताई तिखे रवि जोगी दत्ता धावरे सुरेश हरीरमानीआणि संजय निखारे संदीप भैय्या महेश राऊत अमित बोरकर मयुर जोगे यांच्यासह वार्डातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
नगीनाबाग प्रभाग ठरणार विकासकामाचे केंद्रबिंदू उपमहापौर राहुल पावडे
जानेवारी ०९, २०२२
0
Tags