भद्रावती:-
शहराच्या प्रमुख मार्गालगतच्या एका देशी दारूच्या दुकानात चला शपथ घेऊया अशा आशयाचा कोरोना सारख्या विषाणूजन्य संसर्गाला हरविण्यासाठी शंभर टक्के लसिकरण करून घेऊया असा दारू पिणाऱ्या ग्राहकांना संदेश देणारा व जनजागृती करण्यात येणारा फलक लावण्यात आला.या फलकामुळे दारू शौकिनामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
याशिवाय दारू ग्राहकांना दारात अडवून आपले दोन्ही लसीकरण झाले किंवा नाही अशी आस्थेने विचारपूस करून लसीकरण झालेल्यांना व मास्क लावलेल्या ग्राहकांनाच दुकानात प्रवेश दिल्या जातो तर ज्यांच्याकडे मास्क नाही अशांना मास्कचे वितरण करण्यात येत असल्याचा प्रकार याठिकाणी दिसून येत आहे.ज्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला आहे