चंद्रपूर :- महाविकास आघाडी सरकार ने अधिवेशनात 28/12/21 रोजी राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारना विधेयक मंजूर करण्यात आले. या काळ्या विधेयका विरोधात भाजपा महानगर चंद्रपूर शिक्षक आघाडी तर्फे निषेध निवेदन सादर करण्यात आला. या काळ्या विधेयकामुळे राज्यपालांच्या अधिकार कमी होणार असून राज्यातील विद्यापीठांवर अंकूश ठेवण्यासाठी प्र-कुलपती पद निर्माण करण्यात येणार आहेत. या प्र-कुलपती पदी राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असणार आहे. यामुळे विद्यापीठच्या कुलगुरूंची नियुक्ती आता राज्यपाल करू शकणार नाही.आता विद्यापीठे राजकारणाचे अड्डे बनतील शिक्षण देण्याच्या मुख्य उद्देश्य पूर्ण होणार नाही हे काळे विधेयक सरकारनी लवकरात लवकर परत घ्यावे करीता महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर भाजपा महानगर चंद्रपूर शिक्षक आघाडी तर्फे जिल्हाधिकारी यांना निषेध निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी भाजपा महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारने, महामंत्री सुभाष कासनगोटूवार,रविन्द्र गुरनुले, भाजपा महानगर चंद्रपूर शिक्षक आघाडी संयोजक अरुण रहांगडाले, आघाडीचे अध्यक्ष मोहम्मद जिलानी, महामंत्री नितीन गुप्ता,प्रफुल्ल राजपुरोहित,बंगाली आघाड़ी अध्यक्ष डॉ.दीपक भट्टाचार्य,पुंजाराम लोढे, रोशन टेम्भरे, विनय कावडकर, डॉ. कुलकणी, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती..
#BJPShikshakAghadi
#BJPShikshakAghadiChandrapur
#MaharashtraPublicUniversityActAmendment
#BJPMaharashtra
#BJPChandrapur
#DevendraFadnavis
#SudhirMungantiwar
#DrKalpanaPande