चंद्रपूर :- जगन्नाथ बाबा नगर येथील चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात आली.
या प्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपमहापौर राहुल पावडे म्हणाले, राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथे झाला. जिजाऊंचे कार्य हे समग्र माता, भिगीनींसाठी आदर्शवत आहे. तसेच स्वामी विवेकानंदाचे कार्य हे अनेक बाजूने महत्वपूर्ण असून त्यांच्या तत्त्वज्ञानानुसार तरुणांनी ध्येय निश्चित करून मार्गक्रमण केल्यास नक्कीच यश मिळेल. स्वामीजींच्या म्हणण्याप्रमाणे युवाशक्ती हीच या राष्ट्राची सर्वोच्च शक्ती असून स्वामीजींनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्याची आजच्या युवापिढीला खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, भाजप शहर सचिव रवी जोगी, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अक्षय शिंडे, संजय निखारे, महेश राऊत, सचिन बोबडे, अमित गोरकर, अमोल मते, वीरेंद्र पिपरीकर उपस्थितीत होते