चंद्रपूर :- पो.स्टे. घुग्घूस हद्दीतील ताडाळी टि पाईंट येथे 1) नागो रूपी रेडलावार रा. बापट नगर, चंद्रपूर यांचा धाबा होता तसेच 2) सुनिल रमेश साखरकर रा. मोरवा याचा त्या ठिकाणी पानठेला होता दोघेही एकमेकांचे सासरे जावई आहे. त्यांचे धाब्यावर चंदू कांबळे हा त्याची पत्नी व दोन मुलासह राहत होता. दि. 17/08/2011 रोजी नागो रेडलावार हा धाब्यावर आला तेव्हा चंदू काबळे याने त्यास त्याचा ७ महिण्याचा पगार मागीतला त्या कारणावरून त्यांचत वाद झाला तेव्हा नागो रेडलावार याने चंदू कांबळे यास खोली खाली करण्यास सांगून त्याचे गालावर थापड मारली चंदू खाली पडला तो उभा होवून नागो रेडलावार यास पगाराचे पैसे मागु लागला तेव्हा नागो रेडलावार याचा जावई सुनिल साखरकर हा आला त्याने चंदू कांबळ याचे हात पकडले तेव्ह नागा रेडलावार याने त्याचे जवळील चाकून चंदू कांबळे यांचेवर वार करून जखमी कले त्यास वाचविण्या करीता चदू कांबळे याची पत्नी आली असता तिला नागो रेडलावार याची पत्नी शहनाज हि आली तिने चंदु कावळे याचे पत्नीस पकडून ठेवले व नागो रेडलावार याने चंदु कांबळे हिला सुद्धा चाकू मारून जखमी केले जखमी अवस्थेत चंदू कांबळे व त्याचे पत्नीस उपचारार्थ दवाखान्यात नेले असता त्यांना मृत घोषीत केले. या वरून पो.स्टे. घुग्घूस येथे दि.17/06/2011 रोजी अप.क्र. 100 / 2011 कलम 302, 34 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयात आरोपी नामे 1) नागो रूपी रेडलावार रा. बापट नगर, चंद्रपूर यांचा धाबा होता सदर 2) सुनिल रमेश साखरकर रा.मोरवा 3) शहनाज सलीम शेख रा. ताडाळी यांना अटक करण्यात आली. सदर गुन्हयात नमुद आरोपीतांना मा.सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. नमुद आरोपी हि सजा नागपूर कारागृह येथे भोगत असताना ते दि.04/05/2013 रोजी 15 दिवस पॅरोल रजेवर आले परंतू से कारागृहात रजा भौगुन परत न जाता ते परस्पर फरार झाले. त्या बाबत पो.स्टे.रामनगर व पो.स्टे घुग्घूस येथे कलम 224 भा.द.वी. अन्वये नमुद आरोपीतांवर दि. 03/09/2013 रोजी गुन्हा नोंद करण्यात आले.
नमुद आरोपीत बंदी हे कोणत्यातरी अज्ञात स्थळावर आपले अस्थीत्व लपवून वास्तव्य करीत होते. नमुद आरोपीत बंदी यांनी अत्यंत कूर पणे एक महिला व पुरुष यांचा धार धार शस्त्राने खुन केला होता. त्यामुळे त्याचे मागावर बरेच वर्षापासून पोलीस स्टेशन रामनगर, घुग्घूस उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर हे त्यांचा शोध घेत होते, परंतू सदर आरोपी बंदी बाबत कोणताही थांगपत्ता किंवा ठोस पुरावा त्याचे अस्थीत्या बद्दल मिळून येत नव्हता. त्यामुळे त्याचे शोध कार्य सुरूच होते. नमुद आरोपीतांचे नातेवाईक, मित्र परीवार व सबंधीतांना सुद्धाविचारपूस करण्यात आली तसेच त्याचे मोबाईल क्रमांक घेवून त्यांचे सुद्धा विश्लेषन करण्यात आले. परतू त्यात सुद्धा आरोपीचा माग मिळून येईल अशी उपयुक्त माहिती मिळाली नाही.
सदर घटनेचे गांभीर्य पाहता नमुद आरोपी बंदी अटक करण्या बाबत वरिष्ठाकडून बारवार सुचना प्राप्त होत होत्या. आरोपीचे शोधासबंधाने लावण्यात आलेल्या मुखबीरव्दारे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांना माहिती मिळाली की आरोपी बंदी नामे 1) नागो रूपी रेडलावार रा. बापट नगर, चंद्रपूर 2) सुनिल रमेश साखरकर रा. मोरया हे आपले अस्थीत्य व नाम बदलवून मौजा पोनाला जि.आदिलाबाद राज्य तेलंगाना येथे वास्तव्यास आहे अशी खात्रीशीर व उपयुक्त माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे सा. यांना देण्यात आली. परीस्थीतीचे गांभीर्य पाहून मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाई. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपनि संदीप कापडे यांचे पथक नेमून तात्काळ पुढील कार्यवाहीस रवाना करण्यात आले.
नमुद आरोपी बाबत माहिती घेतली असता पो.स्टेकोरपना हद्दीतील तेलगाना नजीकचे पारडी या गावात येत असल्या बाबतची माहिती प्राप्त झाल्याने त्यानुसार सदर गावात साफळा रचला असता मुखबीरचे खबरे प्रमाणे दोन इसम येतांना दिसले ते जवळ येताच त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यता आले. त्या इसमांना त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव 1) नागेश मडावी रा. पुनाळा, ता. बेला जि.आदिलाबाद 2) सुनिल गेडाम रापुनाळा, ता. बेला जि. आदिलाबाद असे सांगीतले. त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 1) नागो रूपी रेडलावार रा. बापट नगर, चंद्रपूर 2) सुनिल रमेश साखरकर रा. मोरवा असे सांगीतले त्यावरून त्यांना ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे घेवून आले व पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पो.स्टे. रामनगर व पो.स्टे.घुग्घूस यांचे स्वाधीन करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अरवीद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी याचे मार्गदर्शनाखाली बाळासाहब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर याचे नेतृत्वात स्था. गु.शाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, स.फी. राजेंद्र खनक, पो.हवा. सुरेंद्र महतो, ना. पो. शि.गणेश मोहूल, पो.शि. विनोद जाधव, गणेश भोयर, दिनेश अराडे, महिला पो. शि. अपर्णा मानकर यांनी केली असून पुढील तपास सबंधीत पो.स्टे करीत आहे. सदरची बातमी आपल्या लोकप्रीय चैनल तथा वृत्तपत्रामध्ये प्रकाशीत करण्यास सादर आहे.