Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

जिल्ह्यात 341 नवे बाधित



ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1334

चंद्रपूर, दि. 15 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या बाराशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 91 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 341 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात शनिवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 212, चंद्रपूर 33, बल्लारपूर 21, भद्रावती 5, ब्रह्मपुरी 3, नागभीड 3, सिंदेवाही 2, मुल 20, सावली 1, राजुरा 24, वरोरा 2, तर कोरपना येथे 15 रुग्ण आढळून आले असून पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 90 हजार 459 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 580 झाली आहे. सध्या 1334 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 19 हजार 47 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 27 हजार 114 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

*प्रशासनाचे आवाहन :* नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies