प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती जिल्हा संघटनेचा स्तुत्य उपक्रम
प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटनेच्या आयोजनातून नवीन वर्ष 2022 च्या पहिल्या शुभ दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गांधी चौक चंद्रपूर येथील दूध वाटप व दारू व्यसन मुक्तीवर संदेश पत्रक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते *.या कार्यक्रमाचे उद्घाटक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री.अनिल डोंगरे हे होते.तर प्रमुख अतिथी श्री.लक्ष्मीकांत धानोरकर जिल्हा उपाध्यक्ष.श्री.पंडित काळे जिल्हा कोशाध्यक्ष.श्री.अविनाश राऊत जिल्हा सचिव श्री.भालचंद्र रोहणकर जिल्हा प्रचारक श्री.प्रकाश अल्गमकर.श्री.नारायण खापणे* .हे होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकण्यात आला व प.पूज्य शेषराव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार,पूजा करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.सदर कार्यक्रमात मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमप्रसंगी उद्घाटनिय मार्गदर्शन करताना श्री.अनिल डोंगरे यांनी नवीन वर्षाच्या या शुभ दिनी दारू व्यसणावर एक चांगला संदेश जाऊन दारूच्या आहारी गेलेला समाज व्यसन मुक्त करणे हे उद्दिष्ट ठेवून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून समाजातील बहुतांश लोक दारू व्यसणाच्या आहारी गेला आहे या व्यसनामुळे समाजातील कितेक परिवार उध्वस्त झाले आहे.कितेक लोक या व्यसनामुळे मृत्युमुखी झाले आहे.त्यांची मुले बाळे रस्त्यावर आली आहे.पण ही अशी एक संघटना आहे की या संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील लाखोच्या जवळपास लोक दारू व्यसन मुक्त झाले असून ते लोक आपल्या परिवारात सुख समाधानाने आनंदाने राहत आहे.तसेच या संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील कितेक गावे दारू व्यसन मुक्त झाले आहे.आजच्या घडीला नाघभिड तालुक्यातील नवेगाव उन्देशवरी हा 200 घराची वस्थी असलेला गाव एकेकाळी त्या गावचे 80% लोक दारू व्यसणाच्या आहारी गेलेले होते त्या गावच्या या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज तो गाव संपूर्ण दारू व्यसन मुक्त झाला आहे.आज आपण त्या गावच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करणार आहो.अशा प्रकारे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कार्य हे वाखण्यजोगे आहे अशे ते बोलले.या कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना दूध देऊन संदेश पत्रक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दिगंबर वासेकर जिल्हा संघटक यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री.मारोती वाकुलकर श्री.दीपक ठाकरे.श्री.आकाश श्रीसागर.श्री.प्रकाश भोयर.श्री. शत्रपती कन्नके.श्री.बंडू गोहने.श्री.श्रीकृष्ण पिंपळकर.श्री.भोजराज एकोनकर यांनी अथक परिश्रम घेतले.