Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

दालमिया सिमेंट प्रशासनाच्या जाचाला कंटाळून कामगाराने पत्करला आत्महत्याचा मार्ग....!



कामगार संतोष संकुलवार याचा कंपणीत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक!

चंद्रपुर :- पुर्व श्रमीचे मुरली अँग्रो सिमेंट कम्पनीचे
कर्म चारी व पूर्व मुरली कन्त्राटी कामगार यांना दालमिया सिमेंट प्रकल्पात (नारंडा) सामावून घ्यावे कामगारांना सिमेंट वेज बोर्डनुसार वेतन मिळावे तसेच पूर्वश्रमिचे पॅकींग प्लांट कामगारांना रोजगार मिळावा, दत्तक गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाधरणे आंदोलन १० नोवेम्बर पासून सुरू आहे. आज महाधरणे आंदोलनाचा ” २५ वा दिवस आहे जिल्हा प्रशासनाने, दालमिया प्रशासनाने आंदोलकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने मध्यंतरी सात कामगारांनी २३ नोवेम्बर पासून अन्नत्याग आंदोलन देखील केले, अन्नत्याग आंदोलनाच्या सातव्या दिवशी सात पैकी पाच कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पोलीस प्रशासनाने बळजबरीने २९ नोवेम्बर २०२१ ला अन्नत्याग करणा-या आंदोलकांना उचलून जिल्हा
रुग्णालय चंद्रपुर येथे उपचारार्थ दाखल केले तरी देखील जिल्हा प्रशासनाने, दालमिया प्रशासनाने दखल घेतली नाही त्याच्या पश्चात कामगारांच्या पत्नीने देखील अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे, तरी देखील कंपनी प्रशासनाचे एच. आर. उमेश कोल्हटकर व सिनियर मैनेजर पराग पानपट्टीवार यांचा मनमानी तुघलकी कारभार सुरूच आहे. आंदोलनकर्त्या पूर्व मुरली कर्मचारी व कंत्राटी कामगारांना तसेच पैकिंग प्लांट कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आमदार, खासदार देखिल उदासिन आहेत.

“महाधरणे आंदोलनाला " कामगारांचा दत्तक गावातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील आहे.

कामगारांच्या समस्यांबाबत" महाधरणे आंदोलन सुरू होण्यापूर्वी मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी दालमिया प्रशासन (नारंडा) जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त (केंद्रीय) यांना निवेदन देखील दिले होते परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणूनच १०/११/२०२१ पासून पूर्व मुरली कर्मचारी, कंत्राटी कामगार तसेच पूर्व पॅकीग प्लॉट मुरली कामगार मिळून सगळ्यांनी महाधरणे आंदोलन सुरू केले दरम्यानच्या " काळात आंदोलन मोडीत काढण्याचा देखील प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. परंतु महाधरणे आंदोलन संविधानिक पद्धतीने सुरू असल्याने पोलीस प्रशासन देखील सहकार्याच्या भूमिकेत आहे. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असे सचिन भोयर यांनी प्रशासनाला स्पष्ट सांगितले दालमिया सिमेंट प्रकल्पात काही कार्यरत कामगारांनी आंदोलनस्थळी सहज भेट दिली म्हणून
काही कामगारांना जाणीवपूर्वक कामावरून कमि करण्यात आले, त्यांच्यापैकी प्रकल्पग्रस्त कामगार संतोषभाऊ संकुलवार रा. नारंडा यांनी दालमिया सिमेंट कंपनी एच आर उमेश कोल्हटकर व सिनिअर मैनेजर पराग पानपट्टीवार यांच्या जाचाला कंटाळून काल दि. ३/१२/२०२१ ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास कंपनी परिसरात विष प्रशासन करून आत्महत्येचा मार्ग पत्करता कामगारांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असुन उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. आता तरी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने साहेब यांनी आंदोलनाची दखान घेत पूर्व मुरली कर्मचारी कंत्राटी कामगार व पॅकींग प्लॉट कर्मचा-यांना न्याय मिळवून द्यावा तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणा-या दालमिया सिमेंट कंपनी एच आर उमेश कोल्टकर व सिनीयर मैनेजर (एचआर) पराम पानपट्टीवार यांच्यावरआय.पी.सी अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
अशी मागणी घेऊन कामगारांनी पत्रकार परिषद घेत मनसे चे नगरसेवक सचिन भोयर यांच्या नेतृत्वात विलास सोनवणे, मनोज धानोरकर, श्रीकांत धानोरकर, शालू वांढरे, बेबी झाडे, सिमा लांडगे आदिंची उपस्थिति होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies