Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

अन्न औषध प्रशासनाचे उपायुक्त मोहितेसह निरीक्षकांची नार्को टेस्ट करून निलंबनाची कारवाई करा.Tambaku Chandrapur



सुगंधित तंबाखू अवैध विक्री संबंधी मनसेचे राजू कुकडे यांची अन्न औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगने यांच्याकडे मागणी


चंद्रपूर :- जिल्ह्यात मागील सहा वर्षापासून दारूबंदी होती दरम्यान सुगंधित तंबाखूसह घुटका आणि इतर नशा असणारे पदार्थ सुद्धा त्यावेळी अवैधरित्या विकल्या जात होते,परंतु आता दारूबंदी उठली असताना जिल्ह्यात सुगंधित तंबाखू विक्री जोरात सुरू आहे, या सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन मोहिते व संबंधित निरीक्षक हे सरक्षण देत असून महिन्याकाठी लाखो रुपयाची अवैध वसुली त्यांच्याकडून होत असल्याची माहिती आहे. मात्र जनतेचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या प्रश्नावर त्यांच्याशी संपर्क साधला तर ते म्हणतात की आम्हाला केवळ खाण्याच्या पदार्थात जी भेसळ आहे त्यावरच कारवाई करण्याचे अधिकार आहे व सुगंधित तंबाखू संदर्भात पोलीस प्रशासन कारवाई करतात जे अत्यंत खेदजनक असून त्यांचे जिल्ह्यातील सर्व अवैध सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांशी आर्थिक देवाणघेवाणीचे सबंध आहे आणि महिन्याला 50 लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम हे अधिकारी सुगंधित तंबाखू,घुटका,पानंमसाला व इतर अन्न पदार्थाच्या खरेदी विक्री साठवणूक व वाहतूक करणाऱ्याकडून वसूल करतात त्यामुळे या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करून सत्य बाहेर आणा खोटे बोलून लाखो रुपयाची अवैध वसुली करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी राज्याचे अन्न औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगने यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केली आहे.

त्या निवेदनात राजू कुकडे यांनी नमूद केले की जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी प्रत्त्येक पानठेल्यावर घुटका, सुगंधित तंबाखूचा खर्रा खुलेआम मिळत असताना हे अधिकारी त्यांच्या मोरक्यावर कारवाई करत नाही तर साधे पैकेट मधील खजूर, बदाम व इतर खाण्याच्या गोड पदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करतात,त्यामुळे आपले अन्न औषध प्रशासन विभाग आयुक्त मोहिते हे आपल्या विभागाला मूर्ख बनवून जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याने व त्यांच्याकडून खरी माहिती बाहेर येणे कठीण असल्याने त्यांची नार्को टेस्ट करण्याची आवश्यकता आहे.

पुढे त्यांनी नमूद केले की महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक असताना इतर राज्यातुन येणारा गुटखा व सुगंधित तंबाखू ला आपण रोखू शकलो नाही त्यामुळे सर्हासपणे त्या पदार्थांची विक्री होत आहे, दरम्यान ती रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित मंत्री शिंगने यांच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी (दिनांक 25 नोव्हेंबरला) दिले होते, यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री शिंगने यांच्यासह बैठकीला गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव संजय सक्सेना, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, सहसचिव दौलत देसाई, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात बनावट तंबाखू विक्री यासह गुटखा, सुगंधित तंबाखू वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्याकडून वसुली मोहीम राबविण्यात आपले अन्न औषध प्रशासन अग्रेसर आहे, यामधे शक्ती जुना पोस्ट ऑफिस जवळ चंद्रपूर, जयसुख ठंक्कर बल्लारपूर, वसिम झिगरी चंद्रपूर, गणेश गुप्ता, धुर्व गुप्ता रैयतवारी चंद्रपूर. नुतन ठंक्कर, हरीष ठंक्कर, मनसुख ठंक्कर बल्लारपूर, जितेन्दर ठंक्कर चंद्रपूर, सदानंद, बबलु मुल, नवसाद चंद्रपूर इत्यादीसहअनेक व्यक्ती सुगंधित तंबाखू विक्री करतात व त्यांच्यावर या अगोदर गुन्हे पण दाखल आहे. पण आपले उपायुक्त मोहिते व तीन निरीक्षक त्यांच्याकडून अवैध हप्ता वसुली करतात त्यामुळेच जिल्ह्यात सर्वत्र पानठेल्यावर घुटका व सुगंधित तंबाखू सह खर्रा खुलेआम मिळत आहे, अर्थात अन्न औषधी प्रशासन विभागाच्या संमती शिवाय हे शक्य नसल्याने यासंदर्भात उपायुक्त मोहिते व तीन निरीक्षकांची नार्को टेस्ट करून त्यांच्यावर शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करावी अन्यथा आपण आपल्या प्रशासनाला पाठबळ देऊन जनतेच्या आरोग्याशी आपण सुद्धा खेळत असल्याची बाब राज्यस्तरावर प्रसारमाध्यमांसमोर मांडून जनांदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा राजू कुकडे यांनी निवेदनातून अन्न औषध प्रशासन मंत्री शिंगने यांना दिला आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक,अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव. प्रधान सचिव संजय सक्सेना, अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त
परिमल सिंग, अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंग, सहसचिव दौलत देसाई यांच्यासह
चंद्रपूर चे जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे यांना देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies