चंद्रपूर :- शहरातील इंदिरा नगर परिसरात नेहमी अनुचित घटना घडत आहे त्यात घरफोडी दरोडे ह्या घटना सातत्याने होत असून इंदिरा नगर परिसरातील जनतेनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड आणि विधानसभा अध्यक्ष सुनील काळे ह्यांच्या कडे आपल्या व्यथा व्यक्त केेली आणि आज दिनांक 06/12/21 ला राजीव कक्कड आणि सुनील काळे ह्यांच्या मार्गदर्शनात शहर महासचिव संभाजी खेवले ह्यांच्या नेतृत्वात आज रामनगर पोलीस निरीक्षक मुळे साहेब ह्यांना निवेदन देऊन इंदिरा नगर येथील घरफोडी आणि इतर गुन्हेगारी समंदी निवेदन देण्यात आले निवेदन देण्यात आल्या नंतर ह्या वर ताबडतोब कार्यवाही करून गुन्हेगारी आटोक्यात आणल्या जाईल असे आश्वासन देण्यात आले
निवेदन देते वेळी शहर सचिव मुन्ना तेमबुरकर आणि प्रभाग अध्यक्ष नंदू जोगी उपस्थित होते