मुंबई, 24 डिसम्बर: महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. अशावेळी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.
आज रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार राज्यभरात एकाच ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीवर बंदी असणार आहे. कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल. कोणत्याही कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजकांना 50 हजारांचा दंड भरावा लागणार आहे