तालुक्यातील ग्रामीण भागातील 1780 नागरिकांनी घेतला लाभ
शेवटच्या दिवशी पेल्लोरा येथे रेकॉर्डतोड 210 नागरिकांनी घेतला लाभ
जनसेवा हीच ईश्वरसेवा या हेतूने स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या पुढाकाराने राजुरा शिवसेनेच्या वतीने गावोगावी नेत्रातपासणी आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात पेल्लोरा येथे 210,पांढरपौनी येथे 152, चंदनवाही येथे 143,वरुर रोड येथे 115,साखरवाही येथे 90, गोवरी येथे 173,कलमना येथे 130,चिंचोली येथे 124, सुमठाणा येथे 103,रामपूर 100,भेदोळा येथे 80,तर साखरवाही येथे 90, चिंचबोडी 135,सोनुर्ली 35, पाचगाव 50, भुरकुंडा 40 यासंह असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून चालू असलेल्या या शिबिराला यशस्वी करण्यासाठी विधानसभेचे समन्वयक बबन उरकुडे, तालुका प्रमुख वासुदेव चापले, तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, शहर प्रमुख निलेश गंपावार,युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर,उपतालुका प्रमुख रमेश झाडे, उपतालुका प्रमुख सुधाकर मोरे, शहर समन्वयक बबलू चव्हाण यासंह अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.