स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपुर द्वारा आवाहन
वरोरा :
दक्षिण आफ्रिकेमधे आढळून आलेल्या कोरोनाच्या 'ओमीक्रोन' या नव्या व्हेरीअंट मुळे अवघ्या जगाच्या चिंता वाढल्या आहे. 'ओमीक्रोन' हा कोरोनाचा नवा विषाणू 'डेल्टा'पेक्षा कित्येक पटींनी अधिक संसर्गजन्य आहे. या कोरोनाच्या 'ओमीक्रोन' या नव्या व्हेरीअंटला जिल्ह्यात प्रतिबंध करा, कोविड-१९ च्या संभाव्य तिस-या लाटेचा धोका टाळा, असे आवाहन स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपुरद्वारा करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेदरम्यान भद्रावती शहरात निशुल्क कोविड केअर सेंटर सुरु करणारे स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवि शिंदे यांनी सांगितले की, या पार्श्वभूमीवर नागरीकांनी दोन्ही डोस घेवुन लसीकरण पुर्ण करावे.
कोरोनाच्या दुस-या लाटेपासुन रवि शिंदे यांनी वरोरा व भद्रावती तालुक्यात कोरोनाविषयी जनजागृतीचा यज्ञ तेवत ठेवला आहे. गावागावात त्यांचे मदतकार्य सुरु आहे. त्यामुळे परत कोरोनाची तिसरी लाट येवू नये यासाठी त्यांचे आवाहन आहे.
कोविडच्या नविन व्हेरीअंटने देशात हातपाय पसरायला सुरुवात केली. हा व्हायरस झपाट्याने पसरत आहे. नविन डेल्टा प्लसच्या ब-याच केसेस महाराष्ट्र, तामिळनाडु, पंजाब, आणी मध्यप्रदेशात आढळल्या आहेत. जरा परीस्थिती निवळली नाही की नविन संकट उभे होते व जनतेमधे भीतीचे वातावरण निर्माण होते. म्हणुन लसीकरण, सतर्कता व कोविड नियमांचे पालन या सुत्रीनेच कोरोनापासुन आपण बचाव करु शकतो, असे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहे. त्यामुळे नागरीकांनी घराबाहेर पडतांना दुहेरी मास्क घालावे, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, २० सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवावे, फिजिकल डीस्टंसींगचे पालन करावे, घरी व आसपासच्या वस्तु स्वच्छ ठेवाव्या, निर्ज्ंतुकीकरण करावे, आदी सुचना पाळायच्या आहेत.
कोरोनाच्या नव्या व्हेरीअंटच्या लक्षणामधे ताप, कोरडा खोकला, घसा खवखवणे, थकवा, डोकेदुखी, अतिसार, चव आणी गंध कमी होणे, यासोबतच छातीत दुखणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचेवर पुरळ उठणे, बोटाच्या रंगात बदल, आदींचा समावेश आहे. तेव्हा त्वरीत तज्ञांचा सल्ला घेवुन व तपासणी करुन उपचार घ्यावे, असेही ट्रस्टद्वारा सांगण्यात आले आहे.