Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करा
अन्यथा मनसे स्टाईल करणार आंदोलन, महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना मनसेने दिला इशारा.


(चंद्रपूर प्रतिनिधी ):- विदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आजवर झाल्या आहेत, त्यात येथील शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था सरकारने दिली नव्हती हे प्रमुख कारण होते, मात्र आता सिंचनाची व्यवस्था शेतकऱ्यांना मिळाली असतांना सुद्धा महावितरण कंपनी द्वारे दिवसा वीज पुरवठा मिळत नाही, त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते. सोबतच जंगली जनावर व वाघांची भीती असल्यामुळे रात्रीला शेतात सिंचन (ओलित) करणे शेतकऱ्यांना शक्य नाही.


शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही महत्वाची बाब म्हणजे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिवसभर सिंचनासाठी वीज पुरवठा केल्या जात आहेत,मग चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 4500 मेगावॉट पेक्षा जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा का करण्यात येत नाही? हा अतिशय गंभीर प्रश्न असून अगोदरच अतिवृष्टी झाल्याने कापूस सोयाबीन यासह तूवर या पिकांवर मोठा परिणाम झाला व दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची तूट भरून काढण्यासाठी रब्बी पीक महत्वाचे आहे आणि यासाठी चना, तीळ, जवस व भाजीपाला यासाठी ओलित करणे आवश्यक आहेत, मात्र वीज महावितरण कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा केवळ आठवड्यात केवळ दोनदा वीज देत आहे व पाच दिवस रात्रीला वीज देण्यात येते हा शेतकऱ्यांवर अन्याय असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा अन्याय कदापिही सहन करू शकणार नाही, कारण जगाचा पोशिंदाच जर हतबल असेल तर मग लोकप्रतिनिधी व सत्ताधारी नेमके काय करत आहे? व ऊर्जा खाते हा अन्याय का करत आहे हा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वीज महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंता यासह राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदनाद्वारे विचारला आहेत,

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करावी अन्यथा वीज महावितरण कंपनी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देऊन त्यांच्यावर अन्याय करीत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वीज महावितरण कंपनी विरोधात मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार,जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे,जिल्हा सचिव किशोर माडगुलवार यांनी वीज महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies