Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

"डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त...."






जय भीम' नारा... कुणी दिला ?

'जय भीम'चा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास एल. एन. (लक्ष्मण नगराळे) यांनी १९३५ मध्ये दिला, अशी नोंद आहे.

बाबू हरदास, हे सेंट्रल प्रोव्हिन्स-बेरारच्या काऊन्सिलचे आमदार होते आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे एक प्रखर कार्यकर्ते होते.

नाशिकच्या काळाराम मंदिरातला लढा, चवदार तळ्याचा सत्याग्रह.... यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव महाराष्ट्राच्या, देशाच्या घराघरात पोहोचले होते. त्याची परिणती म्हणून, त्यानंतर डॉ. आंबेडकरांनी महाराष्ट्रातून दलित नेत्यांची जी फळी उभी केली होती, त्यापैकी 'बाबू हरदास' हे एक होते.
बाबू हरदास यांनीच 'जय भीम'चा नारा दिल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या "दलित मूव्हमेंट इन् इंडिया अँड् इट्स लीडर्स", या पुस्तकात आहे.

गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण यावे; तसेच, समतेविषयक विचार गावोगावामध्ये पोहोचावेत, हा विचार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'समता सैनिक दला'ची स्थापना केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे, ते सचिव होते.

'थेट बाबासाहेबांनाच जय भीम म्हटलं गेलं तेव्हा....'

"डॉ. आंबेडकरांच्या हयातीतच 'जय भीम' या अभिवादनाला सुरुवात झाली. चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांना तर 'जय भीम' म्हणतच असत; पण, एखादा कार्यकर्ता थेट बाबासाहेबांनासुद्धा 'जय भीम' म्हणत असे. त्या वेळी बाबासाहेब, त्या व्यक्तीच्या अभिवादनाचे उत्तर केवळ स्मित हास्य करुन देत असत!"

_"जय भीम", हे केवळ, एक 'अभिवादन' नाही; तर, ती एक 'व्यवस्था-बदला'च्या चळवळीची समग्र ओळख झाली आहे....._

या ओळखीचे विविध पदर आहेत... 'जय भीम' म्हणजे, संघर्षाचे प्रतीक झाले आहे, ती एक सांस्कृतिक ओळख देखील झाली आहे, त्याच बरोबर राजकीय ओळख देखील आहे... आंबेडकरी चळवळीशी असलेले नाते देखील, यातून प्रकर्षाने दिसते... "हा उद्गार, निर्मम-शोषक व्यवस्थेच्या वरंवट्याखाली दबल्या गेलेल्या सर्वहारांच्या, सर्व प्रकारच्या 'अस्मितेंचं प्रतीक' बनला आहे...."

'जय भीम' ही समतेच्या क्रांतीची चैत्यभूमीतून प्रस्फुटित झालेली 'चेतना' बनली आहे!!!"

".....जवळपास चार दशके आम्ही कामगार-चळवळीतले दाहक व भीषण स्वरुपाचे अनुभव घेतल्यानंतर (ज्यांच्यासाठी, जीवावर उदार होऊन आयुष्यभर लढत आलो... त्यांनीच, पाठीवर एवढे वार केलेत की, नव्या वारांसाठी आता जागाच शिल्लक राहीलेली नाही) तर, बाबासाहेबांनी परिवर्तनाची लढाई लढताना, तहहयात काय खस्ता खाल्या असतील, चळवळीत काय दाहक अनुभव घेतले असतील.... त्याची, साधी कल्पनासुद्धा आमच्या अंगावर काटे उभे करते!"

आजच्या, "कंत्राटी-कामगार पद्धतीच्या आणि आऊटसोर्सिंग"च्या राजकीय-काॅर्पोरेटीय षडयंत्राने, तळागाळातील तरुण श्रमिकवर्ग पुन्हा एकवार "गुलामीला आणि उद्योग-सेवा क्षेत्रातील नवअस्पृश्यते"ला तोंड देताना पहाताना.... छातीत आणि मस्तकात एक तीव्र कळ उठत रहाते; जी, बाबासाहेबांच्या समतेच्या कार्याचं सद्यस्थितीतलं महत्त्व, मनोमनी प्रखरतेनं अधिकच अधोरेखित करते... "सर्वांना त्यांच्या क्षमतेनुसार (म्हणूनच, बाबासाहेबांनी 'श्रमाची विभागणी मान्य केली होती... श्रमिकांची नव्हे') आपल्या कवेत घेऊ शकणार्‍या, ज्या एकप्रकारच्या 'आध्यात्मिक-भांडवलशाही'ची (Spiritual-Capitalism) संकल्पना बाबासाहेबांच्या मनात घोळत असावी... त्या संकल्पनेची, शोषित श्रमिकांच्या घामा-रक्तानं भिजलेली लक्तरं, आजच्या घडीला 'तोरणं' म्हणून प्रस्थापित राजकारण्यांच्या आणि भांडवलदारांच्या आलिशान घरांच्या दारांच्या चौकटीवर लटकतायतं... त्या श्रमिकवर्गाला, जन्माची परित्यक्त स्वरुपाची 'जात' कदाचित नसली; तरी, या कंत्राटी-युगात जन्मानं लाभलेलं 'अर्धउपाशी पोट' मात्र, लाभलेलं आहेच!"

श्रमिकवर्गाचं दुर्दैव हेच की, "१४ एप्रिल आणि ६ डिसेंबर हे, बाबासाहेबांच्या जयंति-मयंतिचे दिवस वगळता... त्यांच्या, 'समतेच्या संदेशा'चा साधा उच्चार सुद्धा, व्यवस्थेतल्या धुरिणांना 'आरडीएक्स'(RDX) सारखा विस्फोटक वाटत रहातो... कारण, ही संपूर्ण 'रक्तपिपासू-शोषक व्यवस्था' (Vampire-State System), 'कंत्राटी-कामगार पद्धती'तल्या (Contract-Labour) कामगार-कर्मचारीवर्गाच्या अमानुष शोषणावरच तर, आधारभूत असते!"

_.... राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)_

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies