घुग्घुस प्रतिनिधी - विजयक्रांती एसीसी सिमेंट कंत्राटी कामगार संघटनेचा कु. शिवानीताई विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या निवडणूकीस संयुक्त पाठिंबा असणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे.
यासंदर्भात घुग्घुस येथून जवळच असलेल्या नकोडा येथे विजयक्रांती एसीसी सिमेंट कामगार संघटनेची संयुक्त बैठक घेण्यात आली. पारपडलेल्या बैठकीत कु. शिवानीताई वडेट्टीवार यांना विजय करण्यासाठी संघटनेचे सर्व कार्यकर्ते पुढाकार घेतील व पूर्ण पाठींबा असणार असे जाहीर केले.
यावेळी विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लबचे अध्यक्ष प्रवीणभाऊ लांडगे यांच्या नेतृत्वात आयोजित बैठकीत सोनू चिवंडे, अजय उपाध्ये, रमेश रुद्रारप, नितीन पटेल, सतीश शेंडे, कासम भाई, सुनील जुमनाके व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.