नोंदणी सुरु असलेल्या ठिकाणाची पाहणी, अनेक बाबी उघड
चंद्रपूर, गडचिरोली सुरक्षा मंडळाच्या वतीने चंद्रपूर - गडचिरोली जिल्हाकरीता समुच्चय पुल तयार करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. मात्र या प्रक्रियेत घोळ सुरु असल्याच्या तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर आज स्वतः आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर प्रक्रिया सुरु असलेल्या ठिकाणी पोहचून माहिती घेतली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी संताप व्यक्त करत सदर प्रक्रिया पारदर्शी करण्याच्या सुचना सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईत यांना दिले आहे.
चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात, मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नोंदित कारखाने, आस्थापने आदि ठिकाणी मागणीनूसार सुरक्षा रक्षक पूरविण्याकरीता सुरक्षा रक्षकांच्या समुच्चय पूल तयार करण्याचा निर्णय चंद्रपूर गडचिरोली सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. तशी जाहिरातही प्रसिध्द करण्यात आली आहे. या 500 सुरक्षा रक्षकांच्या जागेसाठी राज्यभरातील जवळपास 4 हजार उमेदवारांनी अर्ज केला आहे. दरम्याण एमईएलच्या पटांगणात सदर नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेची जबाबदारी पुणे येथील सेराइज टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपणीला देण्यात आली आहे.
मात्र या प्रक्रियेदरम्याण मोठा घोळ सुरु असून उमेदवारांची आर्थिक फसवणूक केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. याची दखल घेत आज स्वतः आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर नोंदणी प्रक्रिया सुरु असलेल्या एमईएलच्या पटांगणात जावून पाहणी केली. यावेळी चंद्रपूर, गडचिरोली सुरक्षा रक्षक मंडळाच्या एका कर्मचाऱ्यासह नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीच्या एका व्यक्तीची उपस्थिती होती. सदर व्यक्तीकडे कोणतेही ओळखपत्र तथा नियुक्तीपत्र नव्हते. त्यामुळे या प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाला. त्यामूळे आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलाच संताप व्यक्त करत सदर प्रक्रिया पारदर्शी करण्याच्या सुचना दुरध्वनी वरुन सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिल्यात.
आलेल्या उमेदवारांची कोणतीही सोय येथे करण्यात आली नसल्याचे यावेळी दिसून आले. उमेदवारांना कोणत्या अटीवर पात्र ठरविण्यात येणार हा प्रश्न केला असता याचे समाधानकारक उत्तर उपस्थित अधिकारी देवू शकले नाही. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर प्रक्रिया पूर्णतः पारदर्शी होईपर्यत नोंदणी प्रक्रिया थांबविण्याच्या सुचना सहाय्यक कामगार आयुक्त यांना केल्या आहेत. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, पंकज गुप्ता, राशिद हुसेन, दिपक पद्मगीरीवार, गौरव जोरगेवार, राजिक खान, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नोंदणीसाठी आलेल्या युवकांच्या पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.