बंगाली कॅम्प येथे श्रमिक कार्डच्या निःशुल्क नोंदणी शिबिराचे आयोजन
चंद्रपूर:- शहरातील बंगाली प्रभाग क्र 4 येथे श्रमिकांच्या निःशुल्क नोंदणी शिबीराचे आयोजन 30 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान करण्यात आले आहे या कालावधीत नागरिकांना श्रमिक कार्डची नोंदणी करून देऊन प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे शिबिराच्या उद्धघाटन कार्यक्रमा प्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर सचिव तथा प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार व प्रसार अभियान महिला जिल्हाध्यक्षा अॅड. सारिका संदूरकर यांनी सांगितले की केंद्रातील नरेंद्रभाई मोदी सरकारने अनेक जनकल्याणकारी योजना नागरिकांच्या कल्याणासाठी राबविल्या त्या योजना यशस्वी झाल्या आता श्रमिकांची ई नोंदणी करण्याचा अभियान सुरू असून हे अभियान जनसामान्यांसाठी हिताचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले या नोंदणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपुर महानगर उमेश नक्षीने,सचिन संदूरकर अध्यक्ष भाजपा ओबिसी मोर्चा चंद्रपुर बंगाली कॅम्प मडळ,युवा मोर्चा बंगाली कॅम्प महामंत्री अंकित जोगी उपाध्यक्ष ओबिसी मोर्चा रमेश वाढई,अक्षय दांडेकर,मिलिंद मेश्राम,उद्धवजी मेश्राम निलचंद वैरागड़े,राधेश्याम मोरे,मनोज ढेंगेळे,पारा मोरे,रुपाली वाढई,दुर्गा पधरे,अर्चना ढेंगळे,नम्रता शेंडे,दिगेश्वर राजगड़े, सूरज सुर्तीकर,राहुल, जुल्मी रमेश गुरनुले यांनी अथक परिश्रम घेतले