Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत निर्मिती केंद्र उर्जानगर वसाहती मधील वाघ, बिबट व अस्वल यांचा तात्काळ बंदोबस्त करा



अन्यथा तिव्र आंदोलन..!

मुख्य वनसंरक्षक यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन..!

वसाहतीत तिन बछड्यासह वाघीणीचे वास्तव..!

वावर असल्याने त्यांना जेरबंद करण्याची उपाययोजना करून वनविभागाची चौकी तात्काळ द्यावी..!

चंद्रपूर :- महाऔष्णीक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जाण्यासाठी नागपूर रोड वरून जाणारा रिंग रोड वसाहतीत जातो. या परिसराच्या दोन्ही बाजूला नाले असून जंगल व्याप्त परिसर असल्यामुळे वाघांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात असते.

या भागात ऊर्जानगर वसाहत कॉलनीच्या आजूबाजूला अनेक गाव वस्त्या असून ताडोबाला लागून जंगलाचे परिसर असल्यामुळे या भागात वाघ, बिबट,आस्वल तसेच हिस्त्रपशूचे वास्तव्य आहे.

नेहमी या भागामध्ये वाघाचे हल्ले होत असतात. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र वन विभागाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा वन विभाग कुठलीही दखल घेताना दिसून येत नाही.

येत्या काही दिवसात वाघाचा बंदोबस्त झाला नाही तर या परिसरात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे , ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खंन्नाडे, ग्रामपंचायत सदस्य अंकित ढेंगारे, शुभम आबोदकर, सौरभ घोरपडे, अभिनव देशपांडे, ऋषभ घाटे, अभिजीत मडावी, सौरभ घाटे, भाग्यवान झोडे, पवन मेश्राम, यांची उपस्थिती होती.

आशिया खंडातील सर्वात मोठा महाऔष्णीक विद्युत केंद्र, चंद्रपूर उर्जानगर येथील परीसरात वाघ व बिबट यांचा नियीमत वावर असल्याने काल दिनांक ०२/१२/२०२१ रोजी सांयकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान एका नागरीका वर वाघाने हल्ला केल्याने अशा प्रकारच्या घटना वारंवार घटना होत आहे.

या अगोदर सुध्दा उर्जानगर परीसरामध्ये बिबटयाने हल्ला करुन एका पाच वर्षाच्या मुलीचा जीव घेतला. उर्जानगर वसाहती मधील वाघ, बिबट व अस्वल यांचा वावर असल्याने त्यांना जेरबंद करण्याची उपाययोजना तात्काळ करून वनविभागाची चौकी तात्काळ देण्यात यावी.

उर्जानगर वसाहतीत ये-जा करणारे कर्मचारी व ईतर रहदारी करणारे नागरीक सुरक्षीत नसल्यामुळे नेहमी दशहतीत असतात.

त्यामुळे सदर बाबीवर गांर्भीयपुर्ण विचार करण्यात यावा अन्यथा यापुढे प्राण हिंसेच्या घटना घडल्या तर वनविभागाला जबाबदार धरण्यात येईल.

तरी सदर उपरोक्त बाबीचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies