सोनटक्के यांचे पून्हा भ्रष्टाचाराचा नविन कारनामा ?
वरिष्ठांच्या आशिर्वादाने वनविभागात लुटमार !
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी सन २०२० रोजी निकृष्ट वनांचे पुर्ण वनीकरण कार्यक्रम अंतर्गत प्राप्त निधिची बोगस मजुरांच्या नावाने रक्कम उचलून हडप केले असतानाही त्यांच्यावर कुठल्याच बाबतीत कार्यवाही करण्यात आली नाही.
कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांच्या भ्रष्ट कारनाम्याचा पाढा सन २०२० मध्ये एका न्युज पोर्टल च्या माध्यमातून उघडकीस आणले होते. सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पूराव्यानिशी उघडकीस आणल्यानंतर विभागीय चौकशीअंती सोनटक्के यांच्यावर 14 लाख रूपये वनविभागाला परतफेड करण्याचे आदेश काढून निलंबनाची कारवाई करण्यात आली.मात्र चोरावर मोर बनून मंत्रालय वारी करत आपल्यावरील दोष दुर करीत फक्त २.५०लाख रूपये परतफेड करण्याचे मंत्रालयातून आदेश काढल्याची विश्वसनिय वृत्ताकडून माहीती आहे.
निकृष्ट वनांचे पुर्ण वनीकरण कार्यक्रम अंतर्गत वनपरिक्षेत्रात पुर्ण वनीकरण करावयाचे होते.यासाठी हजारो रुपयांची निधि विभागांतर्गत देण्यात आली.मात्र वनाधिकारी सोनटक्के यांनी पुर्ण वनीकरण न करता बोगस थातूरमातूर कामे करून बोगस मजुरांच्या नावे रक्कमाची उचल करुन ती निधी हडप केली.या कामाची चौकशी होणे गरजेचे होते.मात्र वरीष्ठ अधिकाऱ्यांना आपल्यात सामील करुन "तेरी भी चूप मेरी भी चूप" केल्या या व इतर कामाची चौकशी करण्यात आली नाही.