भाजपा महानगर सचिव राकेश बोमनवार यांचा पुढाकार
चंद्रपूर :- विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी गौरगरीबांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. समर्थ भारत सशक्त भारत हा नारा देत मोदीजींनी या देशाला प्रगतीपथावर नेले आहे. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातुन महिलांना त्यांनी दिलेला आधार फार महत्वाचा आहे. या योजनेअंतर्गत नविन गॅस कनेक्शन वितरीत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेत ही योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्याचे मत भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगर शाखेचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी व्यक्त केले.
भाजपा महानगर सचिव राकेश बोमनवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत नविन गॅस कनेक्शन वितरण कार्यक्रमात जलनगर वार्डात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे, प्रमुख पाहुणे या नात्याने ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश धारणे, अजगर हुसैन आनंद कस्तुरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश बोमनवार यांनी केले. मोदीजींच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातुन भारतीय जनता पार्टीचे संघटक अधिक बळकट करण्यावर आपला भर असल्याचे राकेश बोमनवार यावेळी बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजेंद्र संतोषवार, संतोष झॉ, सुनिल आयतुलवार, विनोद रणदिवे, सुरज कोरडे, सुरेखाताई, बबन राऊत, विक्की मेश्राम आदींनी अथक परिश्रम घेतले.