Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

भ्रष्ट वनाधिकारी सोनटक्के चे शिवशाही मध्ये "लयी भारी"!



साथ अधिकारी व मंत्र्यांची ?

14 लाखांची परतफेड केली 2.50 लाखांवर !

कोण आहे भ्रष्ट सोनटक्के वर मेहरबान !

(संपादक - मनोज पोतराजे,8605592406,7796528979)
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांच्या भ्रष्ट कारनाम्याचा कच्चा चिठ्ठा एका न्युज पोर्टल च्या माध्यमातून उघडकीस आणण्यात आला होता. सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराचे 28 प्रकरण पूराव्यानिशी उघडकीस आणल्यानंतर एका प्रकरणात सोनटक्के यांच्यावर दोषसिद्धींनंतर 14 लाख रूपये वनविभागाला परतफेड करण्याचे आदेश काढूण सोनटक्के यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आश्चर्य म्हणजे आत्ता फक्त 2.50 रू. परतफेड करा. असा आदेश वनविभागाने काढला आहे. चोरटे.यांना साथ अधिकारी व मंत्र्यांची ? अशी स्थिती वनविभागाची झाली आहे. महत्वाचे म्हणजे वन मंत्रालय आजच्या स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे आहे.

सविस्तर वृत्त असे की, 2020 मध्ये सदर प्रकरण एका साप्ताहिकाच्या न्युज पोर्टल ने वनाधिकारी सोनटक्के यांचे भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आणल्यानंतर सोनटक्के यांना विभागीय चौकशी अंती त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र निलंबनानंतरही सोनटक्के यांना वरीष्ठ अधिकारी त्यांची पाठराखण करीत असून फक्त दोन लाख रुपयांची रिकव्हरी दाखवण्यात येत असल्याने एक आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

कुरखेडा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी न केलेल्या कामाचे बिल मंजुर करून त्याची उचल करणे, रोपवन लावण्यासाठी फक्त खड्डे तयार करून झाडे न लावणे, वनपरिक्षेत्रात मंजूर झालेले पक्के रोड झाल्याचे कागदोपत्री दाखवून पुर्ण निधी हडप करणे अश्या कितीतरी निधीची विल्हेवाट वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी लावली होती. त्याच्या या भ्रष्टाचाराचे कारनामे एका वृत्तपत्राच्या न्युज पोर्टलने लावून धरल्यानंतर सोनटक्के यांच्यावर विभागीय चौकशी करण्यात आली. त्या विभागीय चौकशीत वृत्तांत सत्यता आढळून आल्याने सोनटक्के यांचेवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर न केलेल्या कामाचे १४ लाख रुपये शासनाकडे परतफेड करण्याचे आदेश देण्यात आले. निलबंनानंतर सोनटक्के यांची फाईल मंत्रालयात पोहचली.वनाधिकारी सोनटक्के यांचे मंत्रालयात पकड मजबुत असल्याकारणाने त्यांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली. त्यांनी आपली जादुची छडी फिरवत १४ लाख रुपयांचे परतफेडीचे आदेश अवघ्या २.५० लाख रूपयावर आणून ठेवले आणि आपल्यावर असलेले आरोप साठ-गांठ, लेन-देन करून सोडवण्यास यश मिळविले असल्याची चर्चा सध्या गडचिरोली जिल्ह्यात बोलल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies