Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचेही भ्रष्ट सोनटक्केंना साथ




कुरखेडा वनाधिकारी सोनटक्के यांनी केलेल्या कामाचा भुर्दंड कंत्राटदारांच्या माथ्यावर ?

भ्रष्ट सोनटक्के चा पुन्हा भ्रष्टाचार सुरूचं ?
ना धाक ना लज्जा !

वनाधिकारी सोनटक्के यांची निलंबनानंतरही पाठराखण!

गडचिरोली (प्रति.) : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी वनविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या १४ लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे उघड झाल्यानंतर सुध्दा वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळ झोकत आपण भ्रष्टाचार केले नसल्याचे दाखवत भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा केवीलवाणी धडपड सुरू आहे.
कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांच्या भ्रष्ट कारनाम्याचा पाढा एका न्युज पोर्टल च्या माध्यमातून उघडकीस आणण्यात आल्यानंतर व सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पूराव्यानिशी उघडकीस आल्यानंतर चौकशीअंती सोनटक्के यांच्यावर 14 लाख रूपये वनविभागाला परतफेड करण्याचे आदेश काढून निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र "चोरावर मोर" बनून मंत्रालय वारी करत आपल्यावरील दोष दुर करीत फक्त २.५० लाख रूपये परतफेड करण्याचे मंत्रालयातून आदेश काढल्याची विश्वसनिय वृत्ताकडून माहीती आहे.

चोरटयांना साथ अधिकारी व मंत्र्यांची ? अशी स्थिती वनविभागाची झाली आहे. महत्वाचे म्हणजे वन मंत्रालय आजच्या स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडेच वनविभागाची धुरा आहे. मुख्यमंत्रीसुध्दा अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालतील असे कोणालाही वाटत नाही.मात्र भ्रष्टाचारी सोनटक्के यांना वाचविण्यासाठी हा केवीलवाणा प्रयत्न सुरू आहे.

कुरखेडा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी न केलेल्या रस्त्याच्या कामाचे बिल मंजुर करून त्याची उचल करणे, रोपवन लावण्यासाठी फक्त खड्डे तयार करून झाडे न लावणे, वनपरिक्षेत्रात मंजूर झालेले पक्के रोड झाल्याचे कागदोपत्री दाखवून पुर्ण निधी हडप करणे अश्या कितीतरी निधीची विल्हेवाट वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांनी लावली होती. त्याच्या या भ्रष्टाचाराचे कारनामे एका वृत्तपत्राच्या न्युज पोर्टलने लावून धरल्यानंतर सोनटक्के यांच्यावर विभागीय चौकशी करण्यात आली. त्या विभागीय चौकशीत वृत्तांत सत्यता आढळून आल्याने सोनटक्के यांचेवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर न केलेल्या कामाचे १४ लाख रुपये शासनाकडे परतफेड करण्याचे आदेश देण्यात आले. निलबंनानंतर सोनटक्के यांची फाईल मंत्रालयात पोहचली.वनाधिकारी सोनटक्के यांचे मंत्रालयात पकड मजबुत असल्याकारणाने त्यांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली. त्यांनी आपली जादुची छडी फिरवत १४ लाख रुपयांचे परतफेडीचे आदेश अवघ्या २.५० लाख रूपयावर आणून ठेवले आणि आपल्यावर असलेले आरोप साठ-गांठ, लेन-देन करून सोडवण्यास यश मिळविले असल्याची चर्चा सध्या गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे.

सोनटक्के यांनी न केलेली कामे

रस्ता बांधकामात १४ लाख रुपये, रिपेरींगच्या नावाखाली, पाईप लाईन, वनिकरण कामात भ्रष्टाचार व अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करुन आपले पाप कंत्राटदाराच्या माथी मारण्याचा काम सुरू केले आहे. त्यांच्या या भ्रष्टाचाराची सध्या सगळीकडे चर्चा सुरू असून कंत्राटदार त्यांच्या या कारनाम्यामुळे सारेच हैराण आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies