Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

नकोडा वासियांचा धूळ प्रदूषणाविरोधात रस्ता रोको


दोन तास वाहतूक ठप्प

सोमवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता दरम्यान संतप्त नकोडा वासियांनी वेकोलीची होणारी कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक नकोडा मुंगोली मार्गावर रस्तारोको आंदोलन करून रोखून धरली तब्बल दोन तास रस्तारोको आंदोलन केल्याने कोळशाच्या जडवाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या दुपारी 1:30 वाजता रस्तारोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
नकोडा गावाच्या जवळील रस्त्यावरून वेकोली वणी क्षेत्राच्या मुंगोली व पैंनगंगा या कोळसा खाणीतून कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक दिवस रात्र सुरु असते त्यामुळे धुळीच्या प्रदूषणात मोठयाप्रमाणात वाढ झाली याचा नकोडा वासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे धुळीच्या प्रदूषणा मुळे नकोडा वासियांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. वेकोलीतर्फे रस्त्यावर टँकरने पाणी मारण्यात येत नाही आहे व रस्ते ही खड्डे पडून खराब झाले आहे त्यामुळे अपघात स्थळ बनले आहे. वेकोलीला वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नकोडा वासियांनी रस्तारोको आंदोलन केले.

रस्तारोको आंदोलन सुरु होताच घुग्घुस वेकोलीचे उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे व पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी आंदोलन स्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली व चर्चा केली यावेळी वेकोलीने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देताचा रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले तसेच नकोडा वासियांनी नकोडा मुंगोली रस्त्यावर दिवसातून तिन वेळा टँकरने पाणी मारणे, नकोडा येथे वीज ट्रान्सफार्मर लावणे, स्थानिकांना रोजगार देणे, राम मंदिर रस्त्यावर पथ दिवे लावणे, रस्ता सिमेंट कॉक्रिटचा बनविणे, साफसफाई करणे, ब्रेकर लावणे अश्या विविध मागण्याचे निवेदन वेकोलीचे ओमप्रकाश फुलारे यांना दिले.

यावेळी नकोडा जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, सदस्य तनुश्री बांदूरकर, रजत तुराणकर, राजय्या कंपा, प्रभाकर लिंगमपेल्ली, सुजाता गिद्दे, चंदर ताला, भाजपा अध्यक्ष बाळकृष्ण झाडे, आनंद मेंढे, जुनेद सय्यद, कल्पना मेंढे, सरोजा पोल, राजम्मा पोल, इंद्रकुमारी बतुल्ला, पुष्पा तोटा, लावण्या पोल, जया चंडाला, मरियम्मा कंडे, रुची सोप्पर, शारदा मोलगू, सरोजा दासारपू, सुमा तोटा, संजना कोलानी, अमृतराव कंडे, शंकर ननगूरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies