सुगत नगर,छत्रपती नगर,तुकुम येथे रक्तदान शिबिर संपन्न।
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.
सुशासनदिनी रक्तदान श्रेष्ठदान कार्य संपन्न।
चंद्रपूर | शनिवार, दि. २५ डिसेंबर.
देशाचे माजी पंतप्रधान, श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहराच्या वतीने संताजी सभागृहात तुकुम , येथे सुनील डोंगरे जिल्हा महामंत्री भारतीय जनता युवा मोर्चा,चंद्रपूर महानगर यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते।या शिबारात 55 पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान श्रेष्ठदान कार्य श्रध्देय अटल बिहारी वाजपेयीं जी च्या जयंती प्रित्यर्थ संपन्न करून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहेत।
याप्रसंगी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचेहस्ते अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी हे देशाचे सर्वमान्य नेते होते. पंतप्रधान म्हणून देशाच्या निर्णयप्रक्रियेत, विकासप्रक्रियेत सर्वांना सहभागी करुन लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. अटलजींच्या माध्यमातुन भारतीय राजकारणाला सुसंस्कृत चेहरा मिळाला. देशातील सर्व धर्म, पंथ, प्रांताच्या बंधु-भगिनींच्या मनात विश्वास निर्माण करणारे अटलबिहारी वाजपेयी जी आदर्श राजकारणी होते. त्यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. आणि आता मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील “अटलजी ते मोदीजी” असा विकासाचा आलेख वृद्धिंगत होतो आहे. असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले. डॉ मंगेश गुलवाडे जिल्हाध्यक्ष शहर यांनी ही त्यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला, तसेच राहुल पावडे उपमहापौर मनपा चंद्रपूर, यांनी राजकारण समाज सुधारण्याचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ।ही भावना जागृत ठेवून कार्य करावे। मा.अटलजी देशा करिता एक आदर्श आहे त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी खऱ्या अर्थानी त्यांचे विचार ,आदर्श, मानून समाजकारण करावे, असे मत व्यक्त केले, प्रमोद कडू जेष्ठ नेते, ब्रिजभूषण पाझारे ,प्रकाश धारने, विशाल निंबाळकर, रवी गुरनुले, नामदेव डाहुले, सुभाष कासनगोट्टूवार, प्रा.रवी जोगी, प्रज्वलन कडू ,प्रमोद क्षीरसागर, संजय निखारे , कुणाल गुंडावार, मनीष पिपरे ,चांद भाई ,सत्यम गाणार , संदीप मत्ते, सुमित भोजेकर ,अभि काळे ,वैभव सुरदूसे ,कार्तिक शेंडे ,अक्षय शेंडे, राहुल पेटकर ,अविनाश पेटकर , सचिन मत्ते, धम्माप्रकश भस्मे, आदींसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होते ।सुनील डोंगरे यांनी रक्तदान करणाऱ्या लोकांचे मनपूर्वक आभार मानले।