Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

74 वर्षाचा म्हाताऱ्याने केला दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार




चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील किरमिटी (मेंढा) येथे ७४ वर्षीय म्हाताऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना १७ डिसेंबरला उघळकिस आली .याप्रकरणी नागभीड पोलिसांनी आरोपी पांडुरंग लवाजी बावणे (७४) याचावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार म्हाताऱ्या आरोपीने गावाशेजारील बोरे वेचत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने जवळच असलेल्या एका घरात नेऊन अत्याचार केला. याबद्दल कुणाला सांगितले तर मारण्याची धमकी दिली. तर हे चाळे ज्या घरात केले तेव्हा त्याच घरात दुसरी एक मुलगी जेवण करीत होती. त्या मुलीवरही या म्हाताऱ्याने वक्रदृष्टी टाकली. तिच्यावरही त्याने अत्याचार केला. आणि त्या अल्पवाहिन मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्या तीन अल्पवयीन मुलींनी कुठेही घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले नाही. दोन-तीन दिवस अबोल स्वरूपात राहत होत्या. मुलीसोबत काहीतरी घडले असावे, असा संशय वडिलांना आला. मुलीची आई यावेळी बाहेरगावी गेली होती. मुलीच्या आईला गावी बोलावले असता मुलीने आईजवळ सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर मुलीच्या पालकांनी नागभीड पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (१ए), ३७६ (एबी), ५०६ सहकलम ४, ६, १० बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आर. बी. मेढे, सपोनि पूनम पाटील करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies