Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

नऊ गावातील युवक आले प्लास्टिक संकलनसाठी एकत्र


चंद्रपूर :- प्लास्टिक हा पर्यावरणाचा न्हास करणारा घटक आहे.यामुळे मानवाच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.प्लास्टिक निर्मूलनासाठी आणि मानवाच्या आरोग्य संरक्षणासाठी युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र चंद्रपूर जिल्हा युवा समन्वयक शमशेर सुभेदार यांच्या मार्गदर्शनात सुराज्य जनजागृती समिती संस्था आणि उपसरपंच निकीलेश चामरे ग्रामपंचायत ताडाळी यांनी कार्यक्रमाचे आयोजन ताडाळी गावात केले. 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण भारतातील 744 जिल्ह्यात *स्वच्छ गाव स्वच्छ भारत"युज प्लास्टिक वेस्ट संकलन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.स्वच्छ गाव,स्वच्छ भारत मोहीम कार्यक्रम अंतर्गत ताडाळी येथे गवातिमुख्य रस्त्याने स्वच्छता करत जात सार्वजनिक शौचालय परिसर,पाण्याची टाकी आतील व सभोवतालील परिसर,बाजारवटे,जूनी ग्रामपंचायत,पशुवैद्यकीय दवाखाना,अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा परिसर सोबत व्यायाम शाळा– वाचनालय,ग्रामपंचायत परिसरातील स्वच्छता करून वेस्ट प्लास्टिक गोळा करण्यात आले.विशेष मोहीम उपक्रमात खैरगाव (चांदसूर्ला),ताडाळी साखरवाही, मुरसा,मोरवा,पडोली,छोटा नागपूर,विचोडा,सोनेगाव अशा नऊ गावातील नेहरू युवा केंद्राशी सलग्न असलेले विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्यांनी प्लास्टिक गोळा करण्यासोबतच जनजागृतीपर घोषवाक्य नारे देऊन गावकऱ्यांमध्ये "बोले तैसा चाले" असा प्लास्टिक संकलन निर्मूलन स्वच्छतेचा संदेश दिला.सुराज्य जनजागृती समिती ताडाळी पदाधिकारी विश्वास घडसे,युथ स्ट्रगल ग्रूप खैरगाव अध्यक्ष प्रतीक मसराम आणि गुरुदेव सेवा भजन मंडळ चे प्रतिनिधी शिवदास शेंडे आणि ज्योती असेकर यांनी मोहिमेचे यशस्वी प्रतिनिधित्व केले.स्वयंसेवकांनी ताडाळी गावातून 38 बॅग प्लास्टिक संकलन केले.योग्य ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.कार्यक्रमप्रसंगी नेयुके लेखापाल मंगेश दुबे,प्रगती मार्कंडवार,हेमंत सूर्यवंशी,मीनल चीमनवार यांची प्रमुख उपस्थिती होती. वैभव शेंडे,अक्षय एकोनकर,हरिश्चंद्र जानवे,यशवंत धांडे,प्रशिक मेश्राम,अभय बारंगे,प्रणय शेंडे,प्रणय मेश्राम,कुणाल वंजारी,तेजस गोहणे,करण कटगिर,आशितोष ठाकरे,विवेक बेसूरवार,भैरव पिंपळकर,सूरज पारशिवे,कुणाल क्षीरसागर,अजिंक्य मडावी,नयन दुर्वे,अभिषेक ठाकरे,सुमित पारशीवे,साहिल पारशीवे,वृषभ घाटे,स्वप्नील गुरणुले,आदित्य गटलवार यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच स्वच्छता कर्मचारी गणपत शेंडे,राजू मडावी,कवडू आत्राम यांनी विशेष सहकार्य करून प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यात मोलाची मदत केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies