चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागात येत असलेल्या झेप व्यसनमुक्ती केंद्राजवळचा सरकारी नळ बंद केला अशी तक्रार तिथल्या महिलानी भाजपचे प्रज्वलंत कडू यांना भेटून सांगितली. त्यांनी तात्काळ मनपाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून येत्या दोन दिवसात सरकारी नळ पूर्वरत सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. याबद्दल तेथील महिलांनी प्रज्वलंत कडू यांचे आभार मानले.
अमृत योजनेच्या नळाची पाहणी करण्यासाठी तिथे पालिकेचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. अमृत योजनेची पाईप लाईन सुरु झाली म्हणून सरकारी नळाची पाईप लाईन बंद केली असं पालिकेच्या कर्मचाऱ्यांच मत होत. जो पर्यंत झोपडपट्टीतील नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था उभी होत नाही. तो पर्यंत सरकारी नळ सुरूच राहू द्या, असे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रज्वलंत कडू यांनी सांगितलं. महापौर राखीताई कांच्रलावार व उपमहापौर राहुल पावडे यांच्या मदतीने महाकाली प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही प्रज्वलंत कडू यांनी महिलांना दिली. येत्या दोन दिवसात सरकारी नळ पूर्वरत सुरु होणार असल्याने तेथील महिलांनी प्रज्वलंत कडू यांचे आभार मानले.