वार्डवासी संभ्रमात, "तोंडांत बोटे टाकावी की कूचवावी" असा प्रकार !
चंद्रपूर :- माजी खासदार हंसराज अहिर यांनी संन 2018 -19 अंतर्गत खासदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत 26 लाख रूपये निधीनी बांधण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर व्यायामशाळा इमारतीचे लोकार्पण दि. 27 ऑक्टोंबर ला केले होते. त्याच सभागृहाचे लोकार्पण आज १ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष दिनेश चोखारे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती. विशेष म्हणजे माजी खासदार हंसराज अहिर यांच्या हस्ते 27 ऑक्टोंबर ला लोकार्पण करण्यात आलेल्या या व्यायामशाळेचे दुसऱ्यांदा लोकार्पण करण्यात आले. माजी खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते तर आज सध्याचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते एकाच व्यायामशाळेचे दोनदा लोकार्पण करण्यात आले. ज्या परिसरात ही व्यायामशाळा शाळा आहे त्या परिसरातील जनता आजही संभ्रमात आहे तोंडात बोटं टाकावी की कुचकावी.
माजी खासदार हंसराज अहिर यांनी लोकार्पण केल्यानंतर त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाच्या नावावरून माजी खासदार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला होता. हाच कार्यक्रम म्हणजे पुन्हा एकदा व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा सध्याचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. आपापली श्रेय घेण्याच्या प्रकार असल्याची जाणीव नसणारी जनता या ठिकाणी नाही. "पब्लिक सब जानती है." बहुतेक लोक प्रतिनिधी विसरले असतील.