(घुग्घुस प्रतिनिधी ) :- विजय क्रांती संघटनेला घुग्घुस जवळील एसीसी सिमेंट कंपनी सह गडचांदूर जवळील अल्ट्राटेक व अंबुजा कंपनी येथील कामगारांचा पाठींबा मिळत आहे. विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लबचे अध्यक्ष प्रविणभाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली “विजय क्रांती संघटने” कार्य जोमाने सुरु आहे.
विजय क्रांती संघटनेला अनेक कामगार वर्गाचा पाठींबा लाभत असून मोठया प्रमाणात कामगार वर्ग ह्या संघटनेशी जुळत आहे. विजय क्रांती संघटनेच्या अध्यक्षा कु. शिवानीताई विजय वडेट्टीवार यांनी विजयभाऊ वडेट्टीवार यांचा मार्गदर्शनातून उभारलेल्या या संघटनेच्या आधारे कामगार वर्गाला हक्काचे स्थान प्राप्त झालेले आहे. विजय क्रांती संघटनेचा प्रसार अनेक खाजगी कंपनी मध्ये होत आहे. यामध्ये प्रामुख्याने एसीसी चांदा सिमेंट वर्क, अंबुजा सिमेंट कंपनी तसेच अल्ट्राटेक कंपनी मधील कामगार वर्ग मोठ्या संख्येने विजय क्रांती संघटनेत कार्य करीत आहे.
विजय क्रांती संघटना उभारण्यामागे कामगार वर्गाला त्यांचा हक्क मिळवून देणे आहे. तसेच कामगारावर होत असलेले अत्याचाराला प्रतिबंध लावणे ह्या उद्देशातून हि संघटना कार्यकरीत आहे. अंबुजा कंपनी मधील विजय क्रांती संघटनेला पाठींबा देणारे व संघटने मध्ये जुळलेल्या काही कामगारांचा ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांचा हस्ते दुपट्टे देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने विजय ठाकरे, नंदू नागरकर व त्यांचासह सहकरी कामगारांचे विजय क्रांती संघटनेत स्वागत करण्यात आले.