मुल (प्रतिनिधी): मुल - गडचिरोली रोड वरील हिंगोलीतील गांधी चौक परिसरामध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मुल गडचिरोली रोडवर आज दी. 11नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ट्रक क्रं.CG.08Y2011 ने मागून दुचाकी क्रमांक. MH34Z3351 दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव रतन मारोती तलांडे वय वर्षे (62) मुल येथील रहिवासी असून ते सेवा निवृत्त पोलिस कर्मचारी होते.
ट्रकची धडक इतकी जोरदार होती की मृतकाचे शरीर पुर्ण छिन्नविच्छिन्न झाले. धडक देणाऱ्या ट्रक चालकाला घटनास्थळवरून अटक केली असुन. मृतदेह ग्रामिण रुग्णालय मुल येथे मुल पोलिसांनी पाठवले असुन तपास मुल पोलिस करीत आहे.