चंद्रपूर, ता. १५ : दोन वर्षांपूर्वी लालपेठ कॉलरी परिसरात झालेल्या . खून प्रकरणातील तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधींशांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यातील एकाला पुराव्याअभावी निर्देर्दोष मुक्त करण्यात आले. जन्मठेप झालेल्या आरोपींची नाव शिवा गोलू पेराबोइनकर, रामा रायमल्लू कोटा, लक्ष्मण कोटा अशी आहे. हे तिघे चंद्रपुरातील रहिवासी आहे. संतोषी कोटा हिची निर्दोष सुटका झाली. संजू झुनमुलवार यांचा या तिघांनी खून केला होता.
आपसी वादातून तीन जून २०१९ रोजा संजू झुनमुलवार याची हत्या करण्यात आली. शिवा याने संजूवर हल्ला केला. त्क्रारकर्ता राजू गोगुलवार भांडण सोडवायला गेला. तेव्हा शिवा याने राजूला धारदार शस्त्राने जखमी केले. राम आणि लक्ष्मण कोटा याने संजूला पकडून ठेवले. आरोपी शिवा यांने संजूच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. यात राम कोटाची पत्नी संतोषी हिने सुद्धा आणि आरोपींनी संजूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपचारादरम्यान संजूचा मृत्यू झाला. पोलिसांनी उपरोक्त सर्व आरोपींवर भादंवी ३०२, ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.