Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

नगरसेवक श्री नंदू पढाल यांच्या प्रयत्नांना यश




भद्रावती शहरातील अतिक्रमण धारकांना मिळणार जमिनीचे पट्टे" घरकुलाचा मार्ग होणार मोकळा.



भद्रावती :- शहरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून असणाऱ्या कुटुंबांना पट्टे वाटपाची प्रक्रिया नगर परिषद भद्रावती ने सुरू केली असून, भद्रावती शहरातील अतिक्रमणधारकांना जमीन पट्टे देण्यासंदर्भात मागील एक वर्षापासून नगरसेवक श्री नंदू पढाल हे प्रयत्न करीत होते. त्यासाठी त्यांनी मा. ना. श्री एकनाथराव शिंदे साहेब नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिनांक 20/12/2020 ला एक निवेदन सादर केले होते, आणि त्यानंतर ते सतत मुंबई वारी करून त्याचा पाठपुरावा करत होते त्यानुसार ज्या अतिक्रमणधारक जवळ 2011 च्या पूर्वीचा रहिवासी पुरावा म्हणजेच कर आकारणी पावती असेल अशा सर्वच अतिक्रमणधारकांना चौकशी करून जमिनीचे पट्टे देण्यात येणार आहे, त्यामुळे अतिक्रमणधारकांना आता त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मा. ना. श्री एकनाथराव शिंदे साहेब नगर विकास मंत्री यांचे आभार मानण्यात आले असून याचा लाभ सर्वच अतिक्रमण धारकांनी घ्यावा असे आव्हान नगरसेवक श्री नंदू पढाल व श्री राजू सारंगधर यांनी केले आहे. या कार्याचा पाठपुरावा साठी श्री प्रशांत दादा कदम शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रपूर, श्री नितीन भाऊ मते जिल्हाप्रमुख चंद्रपूर, श्री राजू सारंगधर नगरसेवक भद्रावती. यांचे सुद्धा सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies