Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

सिंदेवाहीत लॉजींग हॉटेल की कुंटणखाना ?
तरुणाईत जोश बंद कमरेमे प्यार करेंगे

सिंदेवाही (ता.प्र.) - येथे औद्योगिक शिक्षण संस्था, विज्ञान, गृहविज्ञान, नर्सिंग कॉलेज आहेत. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी येथे येऊन शिक्षण घेतात. वडिलांचा तालुक्याच्या ठिकाणी पाठविण्याचा उदान्त हेतु चांगल्या दर्जाचे शिक्षण हा असतो. ग्रामीण भागातून तरुण तरुणी ह्या उच्च शिक्षणासाठी सिंदेवाहीत येतात.सिंदेवाहीत उपलब्ध असलेल्या सेमी इंग्लिश मिडीयम,विज्ञान,गृहविज्ञान,औद्योगिक संस्थेत शिक्षण घेण्याकरिता वडील त्यांना काबाळकष्ट करून पाठवतात. वडिलांचं उद्देश असतो की माझं मुलं खूप शिकावं आणिआपलं आयुष्य उज्वल करावं. मात्र ह्या वडीलधाऱ्यांचा उद्देश फेटाळून घडतंय ते वेगळंच. तरुण तरुणी ह्या सिंदेवाही तालुक्यातील आजूबाजूच्या ग्रामीण भागातून कुणी शाळेचा बहाणा तर कुणी ट्युशन क्लासेसचा बहाणा करून लवकर येतात, सुट्टीच्या दिवशी येतात किंवा सुट्टी उशिरा झाल्याचा बहाणा करतात आणि आपल्या बॉयफ्रेंड सोबत लॉजवर एक दोन तासांचे १००० ते १५०० रुपये देऊनभाड्याची रूम करून बंद कमरे में प्यार करेंगे चे चाळे करताहेत. एवढंच नाहीतर विवाहित पुरुष / महिला सुद्धा आपल्या घरी खोटं बोलून लॉजिंगवर येऊन जुन्या नव्या प्रियकरांच्या भेटी घेताहेत. अश्या चर्चा थेट सिंदेवाहीतील चायट परीवर, चौकात नागरिकांमध्ये सुरू आहे. इतकं भयंकर चित्र विचित्र कृत्य सिंदेवाहीमधील लॉजिंगवर घडत आहे. मग यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा आहे की नाही ? असा थेट सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

नागरिकांची प्रतिक्रिया
🔹युवक युवतीं दोघांची सहमती असते तर कोण काय करणार ?                     
🔹तरुण विद्यार्थी, विद्यार्थीनींनी वडिलांचा विश्वास तोडून असे कृत्य करणे एकदम चुकीचे आहे. असे कृत्य करत असणार तर पालकांच्या मनात पुढील उच्च शिक्षणासाठी द्वेष निर्माण होऊ शकतो.                         
🔹विवाहित पुरुष यांनी आपल्या पत्नीच्या आणि महिलांनी नवऱ्यांचा मागे असे कृत्य केल्याने अख्खे कुटुंब, संसार उध्वस्त होऊ शकतो. त्याचे विपरीत परिणाम घरच्या मुलींमुलांवर पडतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies