(प्रतिनिधी / सत्यम रामटेके)
चंद्रपूर :- शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून खून, दरोडे, घरफोडी, या घटनेत सातत्याने वाढ होत असून. बुधवारी चंद्रपूर शहरातील अरविंदनगर मध्ये आसलेल्या खनके वाडीतील आरिफ कोळसावाला यांच्या घरी बुरखा धारण करून तीन युवकांनी घरात प्रवेश केला. घरात तीन महिला होत्या. त्यांना पिस्तोल आणि चाकूचा धाक दाखवून पैसे आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. आणि घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व रामनगर पोलिसांचे पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर लगेच शहराच्या अनेक भागात नाकेबंदी करण्यात तपास सुरू आहे. ही घटना शहरांमध्ये दिवसाढवळ्या दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडल्याने शहरात चांगली खळबळ उडाली आहे.