ब्रम्हपुरी :-उत्तर प्रदेश मधील लखिमपुर खेरीं येथे चार शेतकरी व एक पत्रकार हत्याकांडात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचा आणि पत्रकाराचा अस्थिकलश शुक्रवारी (ता.12)ब्रम्हपुरी तालुक्यात येणार आहे.अमरावती,वर्धा,यवतमाळ, वणी,भद्रावती,चंद्रपूर व गडचिरोली मार्गे 7 नोव्हेंबर पासून निघालेला हा अस्थिकलश ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिनी येथे सायंकाळी 6.00 वाजता येणार आहे .तिथे अस्थिकलशा ला अभिवादन करण्यात येईल.त्या नंतर 13 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ब्रम्हपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीद शेतकरी अस्थिकलश अभिवादन सभा होईल.
आशिष मिश्रा या केंद्रीय गृह मंत्र्यांच्या पुढे लोकशाही मार्गाने तीन अन्याय कारक कृषी कायदे मागे घ्या. व शेतकरी हिताच्या ईतर मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या मुलाने चारचाकी गाडी त्यांच्या अंगावर घालून क्रूरपणे त्या शेतकरी व पत्रकाराची हत्या केली.त्यामुळे या शहीद शेतकऱ्यांचा लढा ,विचार व शेतकरी संघर्ष सर्व सामान्य जनतेपर्यंत नेऊन पोहोचविण्याच्या उद्देशाने हा अस्थिकलश संपूर्ण देशभर फिरत आहे.त्याचाच एक भाग म्हणून तो ब्रम्हपुरी शहरासह तालुक्यातील अनेक गावात येईल असे अखिल भारतीय किसान सभेचे नेते तथा संयुक्त किसान मोर्चाचे तालुका समन्वयक कॉ.विनोद झोडगे यांनी सांगितले तसेच या अस्थिकलश अभिवादन सभेला विविध पक्ष,जनसंघटना चे प्रतिनिधी,पत्रकार बंधू आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 13 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ब्रम्हपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या अस्थिकलश अभिवादन सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.