Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

घरात घुसून माकडाने घेतला मुलीला चावा




चंद्रपूर :- शहरातील संजय नगर परिसरामध्ये माकडाने अक्षरशा धुमाकूळ घातला असून. आज रविवारला परिसरातील एका मुलीला घरात घुसून माकडाने चावा घेतल्याची घटना घडली आहे. प्रणाली सुधाकर पाटील असे मुलीचे नाव असून. तिच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.


संजय नगर, कृष्णनगर, इंदिरानगर,शाम नगर, बंगाली कॅम्प, या परिसराला जंगल लागून असल्यामुळे जंगलातील माकड मोठ्या प्रमाणात लगतच्या परिसरातील घरात घुसून धुमाकूळ घालत असतात. नागरिकांनी या संदर्भात वन विभागाकडे अनेकदा तक्रारी सुद्धा केलेल्या आहे. परंतु वन विभागाने ठोस पाऊल उचलले नसल्याने आज दुपारच्या सुमारास काही माकडांची टोळी संजय नगर परिसरामध्ये येऊन धुमाकूळ घालत होती. दरम्यान परिसरात राहणाऱ्या संदेश पाटील यांच्या घरात माकडाने प्रवेश करून प्रणाली पाटील या मुलीवर अचानक माकडाने हल्ला केला. यात प्रणाली जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या अगोदर या परिसरामध्ये माकडांनी हल्ला केल्याच्या घटना अनेकदा घडलेल्या असून. या माकडांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies