भद्रावती :- तालुक्यात चंदनखेडा रोडवरील रणदिवे नामक शेतकऱ्याच्या धानशेतात एका पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. मृत वाघ अंदाजे ३ वर्षांचा असण्याची शक्यता आहे. या वाघाचा मृत्यू शेतातील कुंपणात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
भद्रावती तालुक्यात पट्टेदार वाघाचा मृत्यू
नोव्हेंबर ११, २०२१
0
Tags