Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आसापुरात आगीत घर जळून खाक







● जीवितहानी नाही : दीड लाखाच्यावर नुकसान

जिवती : पहाडावरील जिवती तालुक्यातील असापूर येथे चंदू भिमराव कोटनाके यांचे घर सोमवारी मध्यरात्री जळून खाक झाले. यात त्यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तुंचा कोळसा झाला आहे. यावेळी कुटुंबातील व्यक्ती हे शेतात राखण करण्यासाठी गेले असता. घरी फक्त लहान मुलगी होती.घरी कुणीच नसल्याने ती जेवन करून आपल्या नातेवाईकांच्या घरी जोपयला गेली होती. अचानक मध्ये मध्यरात्री हि घटना घडल्याने सुरूवातीला कुणाला पत्ता लागला नाही.


शेजारी एक बाई उठल्यावर आगीचे दुवा दिसत असल्याने घराला आग म्हणून आरडाओरडा करत पूर्ण गाव जमा झाल्यावर संपूर्ण गावकऱ्यांनी आग विजवण्यात यश आले नाही. आग खूप वेगाने असल्यामुळे पूर्ण घर जाळून खाक झाली आहे. या आगीत कोटनाके यांच्या घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला. यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीत घरातील कागदपत्रे, शेतीचे पट्टे, शेती उपयोगी साहित्य, गादी, कपडे, धान्य, स्वयंपाकाचे भांडे यासह कापूस 12 किंटल 8200 च्या भावाने मिळालेले रोख रक्कम व साहित्त्यासह जवळपास दिड लाखाचे नुकसान झाले आहे .आग विझविण्यासाठी घरी पाणी उपलब्ध नसल्यामुळे दिवाळी सण साजरा करण्याकरिता गावात ड्रम मध्ये पाणी भरून असल्यामुळे तेथील पाणी आणून आग विझविण्यात आली. घरात कोणीच हजर नसल्यामुळे जीवितहानी टळली. आगीत सर्वच भस्मसात झाल्यामुळे अंगावरील कपड्याशिवाय त्यांचे जवळ काहीच शिल्लक राहले नाही. तलाठी गोवर्धन यांनी पंचनामा केला असून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी गावकय्रांनी केली आहे.यावेळी आपग्रस्त कुटुंबीयांच्य भेटीसाठी मलकू पाटील कोटनाके, सत्तरशह कोटनाके, सदस्य,दक्षता समिती,कोटनाके, तालुकाध्यक्ष जिवती तालुका युवक काँग्रेस,सिताराम मडावी महासचिव, जिल्हा युवक काँग्रेस, सलीम शेख, सचिव अल्पसंख्याक काँग्रेस, विकास सोयाम एव्हरेस्ट वीर, दिनेश सोयाम, महादू सोयाम यांनी चंदू कोटनाके कुटूंबियांना भेट देवून सांत्वना केली व एक छोटी आर्थिक मदती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies