Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आरोग्य विभागाचे परीक्षार्थी अडकले चंद्रपुरात

चंद्रपूर :- आरोग्यविभागाच्या 'ड' वर्गाच्या परीक्षा रविवारी 31 ऑक्टोबरला घेण्यात आल्या होत्या. परंतु, राज्य शासनाच्या घोळात व एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात विनाकारण परीक्षार्थी भरडले गेले.राज्यशासनात विलिनीकरण व्हावे यासाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने चंद्रपुरात आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी बसेस उपलब्ध न झाल्याने परिक्षार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

रविवारी (दि. ३१) साडे चार वाजता परीक्षा संपल्या नंतर सायंकाळी जवळपास ३०० ते ४०० विद्यार्थी चंद्रपूर बसस्थानकावर परळी, नांदेड, आदीलाबाद, यवतमाळ येथे जाण्यासाठी जमा झाले. जे आपल्या वाहनाने चंद्रपूरमध्ये दाखल झाले होते ते आपआपल्या मार्गाने परतले. परंतु दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. ते सर्व परीक्षार्थी रात्री दहा पर्यंत बस्थानाकावर ताटकळत बसले होते.

मनसे कडून परीक्षार्थींची भागवली भूक

गैरसोय झालेले परीक्षार्थी रात्री उशिरापर्यंत चंद्रपूर बसस्थानकात अडकले होते. यावेळी या परीक्षार्थींच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार यांनी परीक्षार्थींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी आपल्या परिचयाच्या विविध संघटना, मंत्री, आमदार, खासदार, आरटीओ, व जिल्हाधिकार्यांना मदतीची आव्हान केले. परंतु, कोणीही मदत करू शकले नाही.

मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंह यांनी स्वखर्चाने परीक्षार्थ्यांची रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करून भूक भागविली तर पहाटे ३ वाजता बसची व्यवस्था करून त्यांना आपापल्या ठिकाणी रवाना केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies