चंद्रपूर :- जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात मोखाडा येथील शेतशिवारातील विहिरीत पट्टेदार वाघ पडल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. सकाळी शेतमालक शेतात गेला असता, विहिरीत वाघाचे गुरगुरण्याचा आणि डरकाळ्या फोडण्याचा आवाज आला. त्याने विहीरीत बघितले असता वाघ विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. लागलीच त्याने वन विभागाला माहिती दिली. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. रेस्क्यू ऑपरेशन करून वाघाला बाहेर काढले. दरम्यान, वाघ विहिरीत पडल्याची वार्ता समजताच गावातील नागरिकांनी विहिरीवर गर्दी केली. यातील काहींनी व्हिडिओ काढून ते सोशल मिडीयावर टाकले. हे व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहेत.
विहीरीत पडलेल्या वाघाला बाहेर काढण्यात वन विभागाला यश
नोव्हेंबर ०८, २०२१
0
Tags