Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

अपघातग्रस्‍त समीरला उपचारासाठी आर्थिक मदतनाते आपुलकीचे बहु. संस्‍थेचा पुढाकार

चंद्रपूर ः मोरवा येथील समीर अत्‍यंत गरीब परिस्‍थितीतून शिक्षण घेत एनसीसीच्या माध्यमातून देशसेवेसाठी सैन्‍यात भरती होण्याचे स्‍वप्‍न पाहणार्या समीरचा घरी परतत असताना अपघात झाला. त्‍याला उपचारार्थ खासगी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराचा खर्च मोठा असल्‍याने त्‍याला नाते आपुलकीचे बहु. संस्‍थेने पुढाकार घेऊन आर्थिक मदत केली.
मोरवा येथील समीर जगदीश सिडाम हा युवक क्रिकेट खेळून घरी परतत असताना समीरचा अपघात झाला. या अपघातात त्‍याला पायाला, कंबरेला गंभीर दुखापती झाल्‍यात. त्‍याला उपचारार्थ डॉ. टोंगे हॉस्‍पीटलमध्ये दाखल करण्यात आले. पायाचे ऑपरेशन झाले आहे. यासाठी उपचारासाठी खर्च अधिक येत होता. नातेवाईकांनी दिलेले पैसे सुध्दा संपले होते. समीरच्या मित्राची समाज माध्यमावर मदतीचे आवाहन केले होते. ही माहिती संस्‍थेच्या सदस्‍यांना होताच संस्‍थेच्या सर्व सदस्‍यांनी समीरची घरची परिस्‍थिती बेताची असल्‍याने मदत करण्याचे ठरविले. त्‍यानुसार सोमवारी (ता. ८) डॉ. टोंगे हॉस्‍पीटलमध्ये जाऊन त्‍याच्या आईकडे २१ हजार ५०० रूपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. त्‍यासोबत मेडीकल बिलमध्ये सुट मिळवून देण्याचे आश्‍वासन संस्‍थेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी संस्‍थेचे अध्यक्ष संतोष ताजणे, उपाध्यक्ष किशन नागरकर, हितेश गोहोकार, महेंद्र बांदूरकर, ईश्‍वर घिवे, बंटी तितरे, दिनेश दिवसे आदींची उपस्‍थिती होती.

अनेकांना मदतीचा हात

नाते आपुलकीचे बहु. संस्‍था, चंद्रपूर ही संस्‍था शिक्षण आणि आरोग्‍य ह्या विषयावर काम करते. शिक्षण व आरोग्‍यावर आजवर अनेकांना गरजूंना मदत केली आहे. या संस्‍थेत तीनशेच्यावर सदस्‍य आहे. दरमहिन्‍याला १०० रुपये प्रत्‍येक सदस्‍य जमा करतात. या जमा रक्‍कमेतून गरजूंना मदत करण्याचे सामाजिक कार्य संस्‍था अविरत करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies