Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ना.विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे सिमेंट उद्योगातील कामगारांच्या किमान नवीन वेतनश्रेणीतील त्रुटी होणार दूरसिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील किमान वेतन पध्दतीमध्ये बदल करण्यासाठी समिती होणार गठित

मुंबई,दि.१७: सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योग यातील कामगारांना अल्प वेतन मिळत आहे त्यामुळे किमान वेतनातील त्रुटी दूर करून सिमेंट उद्योगातील कामगारांना एकवीस हजार रूपये किमान वेतन वाढ देण्यात यावी अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात आज झालेल्या बैठकीत केली.कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सिमेंट कामगारांना किमान वेतन लागू करण्यासाठी सिमेंट उद्योगातील कामगारांसाठी समिती गठित करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत दिले.

मंत्रालयातील कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या दालनात सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतनामध्ये दुरूस्ती करून किमान वेतन श्रेणी लागू करण्यासाठी ही बैठक पार पडली.यावेळी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार,कामगार विभागाच्या प्रधानसचिव विनिता सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, सहसचिव एस.एम.साठे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले,वाढती महागाई व कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कामगारांचे किमान वेतन वाढ करणे आवश्यक आहे चंद्रपूर जिल्ह्यात अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड सिमेंट, एसीसी सिमेंट, अंबूजा सिमेंट,दालमिया सिमेंट हे पाच सिमेंट उद्योग असून या मध्ये किमान 15 ते 20 हजार कामगार काम करीत आहे.सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना समान किमान वेतन लागू आहे.या परिपत्रकाचा आधार घेऊन सिमेंट उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत असल्याची बाब विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेने जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती. सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योग हा या दोन वेगळ्या बाबी असून सिमेंट वर आधारित कामगारांना किमान 21 हजार रुपये वेतन देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.यावेळी शिवानी वडेट्टीवार यांनी आतापर्यंत विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन सादर केलेली आहेत. या बैठकीला विजय वडेट्टीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्री प्रविण लांडगे, नंदू नागरकर, विजय ठाकरे, दशरथ राऊत व इतर सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनासाठी समिती गठित करणार :- कामगार मंत्री हसन मुश्रीफ

सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना किमान वेतन मिळावे तसेच कामगारांना किमान वेतन असावे यासाठी समिती गठित करून निर्णय घेण्यात येईल.सध्या कोरोनामुळे कामगार वर्ग अडचणीत आहे.त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.सिमेंट उद्योगातील ठेका श्रमीकांबाबत किमान वेतन समितीसमोर वेतन वाढीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यवाही करावी असे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies