Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

नोकर भरतीच्या नावाखाली सी.टी.पी.एस मध्ये भ्रष्टाचारभरती गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बळतर्फ करा

चंद्रपूर :- आशिया खंडातील सर्वांत मोठा महाऔष्णिक विज केंद्र असलेल्या चंद्रपूर थर्मल महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये प्रकल्प सुरु होऊन ४० वर्ष झाल्यानंतर हि सी.टी.पी.एस. चे आस्थापना विभागात कार्यरत असलेले अधिकारी प्रकल्पग्रस्ताच्या नावावर गैर प्रकल्पग्रस्तांची प्रशिक्षणार्थी म्हणून भरती करीत आहे. या कार्यालयात लाखो रुपयाची देवाण घेवाण होत असून मूळ जमीन मालकाच्या नावावर वारसान म्हणून खोटी कागदपत्रे बनवली जात आहे व लाखो रुपये घेऊन गैर प्रकल्प ग्रस्तांची प्रकल्पग्रस्त म्हणून निवड केल्या जात आहे. या गैर प्रकरणात सी.टी.पी.एस. चे सहाय्यक महाव्यवस्थापक (मास) श्री.अरविंद वानखेडे व त्यांच्या हाताखाली काम करणारे मुख्य लिपिक श्री. वासुदेव कुरेकार आणि अन्य लोकांचे राकेट सहभागी असून मुख्य अभियंता श्री. सपाटे साहेब या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष का करीत आहे? असा सवाल सेल्प रिस्पेक्ट मुव्यमेन्ट चे मुख्य संघटक व ओ.बी.सी. जनगणना समितीचे संयोजक श्री.बळीराज धोटे यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

दीड दोन वर्षांपूर्वी प्रकल्पग्रस्तांनी नोकरीवर कायम करण्याच्या मागणी साठी व नोकरी वर घेण्यासाठी टावर वर चडून आठ दिवस आंदोलन केले होते. याची सर्वांना आठवण असेलच. सी.टी.पी.एस मध्ये प्रकल्पग्रस्तांची नावे खोटी कागदपत्रे तयार करणे व त्याचे खोटे नॉमिनेशन तयार करणे, पैसा घेऊन प्रकाल्यस्तचे नावे नोकरी वर लाऊन देणारे काम करणारे मोठे राकेट सहाय्यक महाव्यव्स्थापक (मासं) श्री. अरविंद वानखेडे व त्यांचा नेतृत्वात सक्रीय असून त्यांनी सी.टी.पी.एस चे आस्थापना विभागातील मुख्य लिपिक वासुदेव कुरेकार व अन्य दलालांचे राकेट या कमी कार्यरत असून या लोकांनी प्रकल्पग्रस्तच्या नावाने नोकरीवर लाऊन देण्याच्या नावाने गरजू लोकांकडून करोडो रुपये उकडलेले आहे असा आरोप बळीराज धोटे नी केला.

नुकताच दिवाळीचा सुट्ट्याचा फायदा घेत श्री. अरविंद वानखेडे सहाय्यक महाव्यव्स्थापक (मासं) यांनी १२८ उमेदवारांची प्रशिक्षणार्थी यादी सी.टी.पी.एस नोटीस बोर्ड वर लावली दि. १२/११/२०२१ पर्यंत आक्षेप घेण्याची मुदत दिली होती. त्या यादीवर बरेच प्रकल्प ग्रस्तांनी आक्षेप घेतलेला आहे. हि यादी लावतांना नोकर भरती कुणाची होत आहे. याचा उलेख नाही मात्र निवड केलेल्या उमेदवाराचे नावा समोर प्रकल्पग्रस्त गावाचे नाव आहे. उमेदवार कोणत्या प्रकल्प ग्रस्तांच्या हक्कावर निवडला गेला याचा उलेख नाही त्यामुळे सदर यादी बोगस प्रकल्पग्रस्तांची असून संबंधितांनकडून लाखो रुपये घेऊन खोटी कागत पत्रे तयार करून हि निवड यादी तयार केलेली आहे. या यादी वर प्रकल्पग्रस्तानी आक्षेप घेतला आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकार च्या उर्जा विभागाने चंद्रपूरचे जिल्हा अधिकारी, पालकमंत्री यांनी या प्रकरणाची चोकशी करावी व त्या अगोदर सी.टी.पी.एस चे श्री. अरविंद वानखेडे सहाय्यक महाव्यवस्थापक (मास) व मुख्य लिपिक वासुदेव कुरेकार यांना वळतर्फ करावे असे मागणी श्री. बळीराज धोटे यांनी केली या पत्रकार परिषदेला भारस्कर सपाट, गुलाब जीवतोडे, आत्माराम देवतळे, विठ्ठल देवतळे, हर्शल जुमडे उपस्थित होते.

दि. ०७/१०/२०२१ ला मा. जिल्हा पुनर्वसन अधिकारी चंद्रपूर यांनी बोगस प्रकरणा प्रपत्र कसे दिले? सी.टी.पी.एस. ची एन.ओ.सी आहे काय? व कुणाला प्रपत्र दिले व किती लोकांना दिले याची माहिती आर.टी.आई अंतर्गत विचारणा केली असता जिल्हा पुनर्वसन अधिकारी चंद्रपूर ने माहिती दिली नाही. त्यांना या संदर्भात दि.०९/११/२०२१ ला स्मरणपत्र दिले आहे. आर.टी.आई विचारलेल्या प्रश्नाची माहिती न दिल्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाचे अधिकारी यात सहभागी असावे असा संशय बळावलेला आहे. चौकशीत सर्व गोष्टी उघड होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies