Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदततालुक्यातील मुधोली येथील शांता घरत यांना मदतीचा हात

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम


भद्रावती :
कोरोनाने पतीचे निधन झाल्यावर निराधार झालेल्या तालुक्यातील मुधोली येथील शांता घरत यांनी सरपंच बंडू नन्नावरे यांच्या माध्यमातून स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट कडे मदतीचे आवाहन करताच ट्रस्ट तर्फे घरत कुटुंबीयांना कपडे, शैक्षणिक साहित्य व आर्थीक मदत करण्यात आली.
तालुक्यातील मुधोली येथील प्रकाश श्रीहरी घरत यांचे कोरोना प्रादुर्भावाच्या दुस-या लाटेदरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शांता प्रकाश घरत सोबत नऊ वर्षाचा मुलगा प्रशांत हा चौथ्या वर्गात शिकत आहे व दोन वर्षाचा मुलगा प्रतिक हा अंगणवाडीत आहे.
घरचा कर्ता पुरुष गेल्याने घरावर दु:खाचा डोंगरच कोसळला. आर्थीक परीस्थिती बिकट असल्याने घरखर्च व मुलांचे संगोपन करण्याची जवाबदारी पत्नी शांता वर आली. अशात समाजातील दात्यांची तिच्या या कठीण प्रसंगी तिला गरज पडली. यासाठी मुधोलीचे सरपंच बंडू नन्नावरे यांनी शांता घरत यांना स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. त्यानुसार शांता घरत यांनी ट्रस्टकडे मदतीसाठी पत्र दिले. पत्र मिळताच ट्रस्टचे रवि शिंदे यांनी घरत कुटुंबीयांना कपडे, शैक्षणिक साहित्य व आर्थीक मदत पाठविली.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळापासुन शिंदे यांचे लोकसेवेचे कार्य अविरत सुरु आहे. ट्रस्टच्या माध्यमातून या कार्यास बळकटी दिली आहे. गरजु, निराधार यांनी ट्रस्टला माहिती देवून मदतीचे आवाहन करावे, ट्रस्ट मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे रवि शिंदे यांनी सांगितले.
यावेळी सरपंच बंडू नन्नावरे, सामाजिक कार्यकर्ते हनुमान राणे, लहु दडमल, लक्ष्मण रणदिवे, मनोहर रंदये, माजी सरपंच तुळशिराम कारमेंगे, सुधाकर वाटकर, नामदेव दडमल, कोंडुजी गराटे, नानाजी गजभे, रामकृष्ण खडसंग, महादेव येवले, गुलाब घरत, शंकर दडमल, धनराज घरत व ग्रामवासी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies