Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मंत्र्यांन समोरच कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महेश मेंढे यांना केली मारहाण



चंद्रपूर :- आज ऊर्जामंत्री नितीन राऊत हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फलकावर पालकमंत्री वडेट्टीवार यांचे छायाचित्रन टाकल्याच्या रागातून काँग्रेसचे विधानसभेचे माजी उमेदवार महेश मेंढे यांना सीटीपीएसच्या विश्रामगृहाजवळ आणी कार्यक्रम स्थळी मारहाण केल्याने काँग्रेसच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये सध्या गटबाजी सुरू आहे.


 पालकमंत्र वडेट्टीवार यांच्याविरोधात एक गट सक्रिय असून, यापूर्वीही एका गटाने शहरात लावलेल्या फलकावर विजय वडेट्टीवार यांचा फोटो लावला नव्हता. त्यामुळे याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली. महेश मेंढे हे नेहमीच वडेट्टीवारविरोधी भूमिका घेत असल्याने वडेट्टीवार समर्थकांमध्ये रोष आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत शनिवार जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचे स्वागतफलक लावण्यात आले. मात्र, मेंढे यांनी लावलेल्या स्वागत फलकावर पालकमंत्री फोटा टाकण्यात आला नाही. त्यामुळे प्रवीण पडवेकर, वडेट्टीवार यांचा संदीप सिडाम यांनी मेंढे यांना जाब विचारला. यावेळी बाचाबाची होऊ प्रकरण हातघाईवर आले. यावेळी मेंढे यांना सिडाम आणि पडवेकर यांनी मारहाण केल्याने राजकीय वर्तु खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies