Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

छोटा नागपूर येथे युवा मंडळाच्या साथीने स्वच्छ उपक्रम
नेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार द्वरा आयोजित स्वतत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव निमित्त संपूर्ण भारतातील ७४४ जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे.स्वच्छ भारत मोहीम कार्यक्रम अंतर्गत छोटा नागपूर येथे मुख्य रस्त्याने जात बुध्द विहार,ग्रामपंचायत अंगणवाडी,शाळा इत्यादी परिसरातील स्वच्छता करत वेस्ट प्लास्टिक गोळा करून जनजागृती करण्यात आली.
गावातील गल्ली बोळातील रस्ते आणि प्रमुख रस्त्यावरील वेस्ट पडलेले प्लास्टिक उचलून सोबत असलेल्या कॅरी बॅग मधे जमा केले.
सोबतच संपूर्ण गावात प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता अभियान राबवत असताना स्वच्छता जनजागृतीपर नारे आणि घोषवाक्य देवून गावाच्या परिसरातील स्वच्छता सोबतच लोकांच्या मनातील स्वच्छता करण्याचे सुद्धा काम युवाक्रांती मंडळ छोटा नागपूर युवा मंडळाच्या समूहाने केले.

याप्रसंगी जिल्हा युवा समन्वयक अधिकारी नेहरू युवा केंद्राचे शमशेर सुभेदार समाज परिवर्तनासाठी सज्ज असलेले उपसरपंच ताडाळी निकीलेश चामरे आणि छोटा नागपूर सरपंच चित्रा गनफाडे उपसरपंच ऋषभ दुपारे,लेखापाल नेहरू युवा केंद्र सहायक मंगेश दुबे आदी उपस्तिथ होते .

यावेळी गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे आणि प्लास्टिक मुळे गावकऱ्यांच्या जीवावर होणारे हानिकारक परिणाम याबाबत विविध लोककला प्रकारच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश दिला गेला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आणि गाव स्वच्छता वेस्ट प्लास्टिक निर्मुलन उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी आकाश दुपारे,प्रकाश दुपारे,संदीप दुपारे ,शुभम झाडे,रुपेश झाडे,संचीन दुपारे, दिशांत दुपारे,ऋतिक काटकर, अमरदिप रंगारी आणि सुराज्य जागृती समिती ताडाळी ची टीम विश्वास घड्से,प्रशिक मेश्राम,अक्षय एकोंनकर,हरिश्चंद्र जानवे,अभय बारंगे,वैभव शेंडे यांनी प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता उपक्रमसाठी मोलाचे परिश्रम घेत उत्तम असे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies