चंद्रपूर दि.१० (प्रतिनिधी):
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा पर्यावरण व प्राणी संशोध संस्था इअर्स चंद्रपूर तर्फे श्री. जयसिंग डोंगरे माजी वैद्यानिक अधिकारी, शासकीय रुग्णालय चंद्रपूर यांचे वाढदिवसानिमीत्याने पत्रकार नगर संस्थेच्या कार्यालयात नुकतेच रक्तदान शिबीर घेण्यात आले या प्रसंगी श्री. जितेन्द्र मशारकर यांनी वाढदिवसा निमीत्य ५९ वे रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली या कार्यक्रमात अनेक स्वैच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान करून एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. बेग, यांनी केले व अॅड. मिलींद लोहकरे, अॅड. जयपाल पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमात श्री किशोर पाटील, अभिनीत पोटे, संजय निकोडे, लवलेश रंगारी, रतन शिलावार, प्रफुल रासपल्ले, रमेश चिकाटे, अमोल पाटील, दिलीप खनके, अजय कवाडे, अजय महाडोळे, दिवाकर पानघटे, इत्यादी मान्यवर उपस्थित राहून श्री. जयसिंग डोंगरे व श्री. जितेन्द्र मशारकर यांच्या वाढदिवसानिमीत्य पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या रक्तदान शिबीराला मा. राहुल पावडे उपमहापौर मनपा चंद्रपूर, स्?थायी समिती सभापती संदीप आवारी, पप्पु देशमुख नगर सेवक या मान्यवरानी सदिच्छा भेट देऊन भावी जिवनांच्या सुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संस्थेचे अध्यक्ष अॅड. सौरभ डोंगरे, सदस्य स्वप्नील बन्सोड, सुमीत महाडीके, वैभव ईस्टाम, बिनु जोगराना, श्रीनिवास धांडुलवार, जगपाल आवळे, ओमदिप मेश्राम, कु. प्रजेशा नायडु, शोखरा प्रशांत डोलीकर, मनोज येडे, अजिक्य चिकाटे, अरविंद मारवाडे व अनेक सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.
या रक्तदानाच्या कार्यक्रमात शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय तसेच सामान्य रुग्णालयातील डॉ. अनंत हजारे रक्तसंक्रमण अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वैद्यकिय चमु उपस्थित राहुन रक्तदान शिबीर संपन्न इ यावेळेस ईअर्सचे अध्यक्ष अँड. सौरभ डोंगरे यांनी सर्वांचे आभार मानले.