Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर मुल या खड्डेमय महामार्गावर कंत्राटदाराकडून गिट्टी डांबराचा सडा

चंद्रपूर ते मूल या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे.या कामाचे कंत्राट अहमदनगर येथील ए.सी.शेख कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे.कंत्राटदाराकडून मागील काही वर्षांपासून संथगतीने काम सुरू आहे.महत्वाचे म्हणजे हे काम निव्वळ डांबरीकरण करण्याचे नसून नवीन काॅक्रीटीकरणाचे होते.मात्र काही संघटनेने यास विरोध केल्याने डांबरीकरणाचे काम देण्यात आले. त्याचा फायदा घेऊन कंत्राटदाराने खड्डेमय रस्त्यावर फक्त गिट्टीमय डांबराचा सडा शिंपून रोडरोलर फिरवत आहे.याकडे मात्र संबंधीत अधिकारी मौनव्रत बाळगून आहेत.या महामार्गाबाबत अनेक तक्रारी झालेले असतांनासुध्दा मुजोर कंत्राटदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

जुन्या डांबरीकरणाचे खोदकाम करून नवीन डांबरीकरण करायचे होते मात्र कंत्राटदारांनी असे काही न करता जुन्याच डांबरावर गिट्टि डांबर टाकून नवीन डांबरीकरणाचे निधीची उचल करीत आहे.

मार्च २०१९मध्ये तात्कालीन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी कंत्राटदारांकडून संथगतीने काम केले जात असल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.शिवाय काम करीत असतांना निष्काळजीपणे काम करून कामा दरम्यान पाइपलाइन तोडणे, पथदिव्यांची पर्यायी व्यवस्था न करणे असे अनेक सार्वजनिक उपद्रवाचे प्रकार सुरू असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदाराला फौजदारी नोटीस बजावली होती.यासंदर्भांत उत्तर ही मागीतले होते.मात्र मुजोर कंत्राटदारांनी कोणतेही उत्तर दिले नाही.एवढेच नाही तर प्रशासनाच्या सुनवाहीलाही कंत्राटदार व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावले नव्हते त्यामुळे सीआरपीसी कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर कोव्हीडच्या प्रादुर्भावामुळे या महामार्गाच्या काॅक्रीटीकरणाकडे सर्वांनी दुर्लक्ष केले होते.त्याचाच फायदा घेत कंत्राटदारांनी फक्त खड्डे बुजवूण्याचे काम सुरू केले आहे.तात्कालीन व विद्यमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याने या महामार्गावर अनेक गंभीर अपघात झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.यामुळे तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, व कंत्राटदारांकडून नुकसान भरपाई घेण्यात यावी असेही सांगितले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी केराची टोपली दाखवली. या महामार्गाचे नवीन डांबरीकरण कनिष्ठ दर्जाचे असल्याने डांबरीकरणाचे उच्च स्तरीय चौकशी करावी व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, संबंधीत कंत्राटदाराला काळा यादीत टाकून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन न केलेल्या करोडो रुपयांच्या नवीन डांबरीकरणाचे शिल्लक असलेले करोडो रुपये शासनाकडे जमा करून घेण्यात यावे.अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies