जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्न स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ, मोहबाळा यांच्या वतीने खुले जिल्हा स्तरीय कबड्डी सामने
वरोरा :
मागील दोन वर्षात कोरोनाच्या दोन लाटेमुळे क्रीडा क्षेत्राची मोठी हाणी झाली. खेळाडुंचे नुकसान झाले. ग्रामीण भागात होणा-या युवकांच्या क्रीडा स्पर्धा थांबल्या होत्या. मात्र आता दोन वर्षांनी होत असलेले हे कबड्डी सामने युवकांमधे नवी उर्जा घेवुन येईल, कोरोनाच्या दोन लाटा ज्या खिलाडीवृत्तीने आपण काढल्या, त्याच खिलाडी वृत्तीने युवकांनी ग्रामीण भागातील समस्या सोडवाव्या. मोहबाळा व परीसरातील ग्रामवासीयांनी ज्याप्रमाणे आसपासच्या उद्योगांमुळे उत्पन्न समस्यांविरोधात लढा दिला, ते कौतुकास्पद आहे, असे मत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवि शिंदे यांनी उद्घाटन प्रसंगी काढले.
जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्न स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ, मोहबाळा यांच्या वतीने खुले जिल्हा स्तरीय कबड्डी सामने दि. २६, २७ व २८ नोव्हेंबर या तीन दिवसात आयोजित आहेत. या निमीत्ताने सामन्यांचा उद्घाटन सोहळा दि. २६ नोव्हेंबरला पार पडला.
यावेळी सामन्यांचे उद्घाटन जिल्हा परीषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राजु गायकवाड यांनी केले तर अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी सभापती ॲड. मोरेश्वर टेमुर्डे व प्रमुख उपस्थिती स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवि शिंदे, सरपंच नंदुभाऊ टेमुर्डे, ठाणेदार दिपक खोब्रागडे, नगरसेवक छोटूभाऊ शेख, अमोल मुथा, जयंत टेमुर्डे, दुष्यंत देशपांडे, अनिल वरखडे, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताभाऊ बोरीकर, शिवसेना वरोरा तालुका प्रमुख मुकेश जिवतोडे, नगरसेवक दिनेश यादव, जगदीश गोचे, ग्रा.पं. मोहबाळाचे पदाधिकारी व ग्रामवासी आदींची होती.
यावेळी जिल्हा परीषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राजु गायकवाड यांनी आपले मत मांडले व खेळाडुंचा उत्साह वाढविला. विधानसभेचे माजी सभापती ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी खेळ खेळतांना जशी चौकस नजर ठेवता, खेळात चांगला खेळाडू पुरस्कृत होतो तसच सार्वजनिक व राजकिय क्षेत्रात चांगले माणस पुरस्कृत करा, असे मत अध्यक्षीय समारोपातून मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता युवकांनी परीश्रम घेतले.